खामगाव:तालुक्यातील बोरी अडगाव येथे संत तुकाराम बीज निमित्त २० मार्च रोजी संध्याकाळी ७ वाजता हवामान अभ्यासक पंजाब डख यांचे व्याख्यान मालेचे आयोजन करण्यात आले आहे. निसर्गाच्या चक्रविव्हात अडकलेल्या शेतकरी बांधवांसाठी अधिक उत्पन्न व नियोजनासाठी कृषी मार्गदर्शन व सत्कार कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. तरी जास्तीत जास्त शेतकरी बंधूंनी कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन शिवशक्ती- भीमशक्ती मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. तालुक्यात प्रथमच शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला परिसरातील शेतकरी बंधूंनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आव्हान आयोजक पुरुषोत्तम मेतकर, शिवशक्ती-भीमशक्ती मित्र मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे. संत तुकाराम बीज निमित्त प्रथमच शेतकऱ्यांना मार्गदर्शन व्याख्यान मालेचे आयोजन केले आहे.संत तुकाराम बीज सामाजिक उपक्रमाने साजरी केली जात आहे. शेतकरी बदलत्या निसर्गाच्या चक्रामुळे हवालदिल झाला आहे व त्याला सामोरे जाण्यासाठी हवामान अभ्यासक पंजाब डख हे मार्गदर्शन करण्याचे आयोजन केले आहे. तरी परिसरातील शेतकरी बंधूंनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात येत आहे.
previous post