शेगांव-: ” साधू संत येती घरा, तोचि दिवाळी दसरा ” याप्रमाणे विनायक महाराज शांती आश्रम येथे अनेक साधू संतांचे आगमन झाल्याने विनायक महाराज शांती आश्रम येथे विठ्ठल नामाच्या गजरात सर्वत्र भक्तीमय वातावरण निर्माण झालेले आहे.श्री विनायक महाराज शांती आश्रम कमेटी आणि गणेश दादा मित्रमंडळ यांच्या विद्यमाने श्रीमद्भागवत सप्ताहाचे आयोजन विनायक महाराज शांती आश्रम परिसरात करण्यात आले आहे.19 फेब्रुवारी रोजी भागवत सप्ताहाची सांगता होणार असून सकाळी 9 ते 11 गोपालकाला व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. भागवत सप्ताहामुळे आश्रमा मध्ये भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. ह.भ.प श्यामजी महाराज बैरागी उटखेळ रावेर यांच्या संगीतमय अमृततुल्य वाणीतून श्रीमद्भागवत कथा व प्रवचनाने भाविक मंत्रमुग्ध झाले आहेत. आश्रमा मध्ये संपूर्ण स्वच्छता करण्यात आली असून तोरणे, पताका, रांगोळी घालुन संपूर्ण आश्रम सजवून जणु आश्रमात पांडुरंग परमात्मा अवतरल्याचे सर्वत्र चित्र निर्माण झाले आहे. काकड आरती, प्रवचन, हरिपाठ,व 8.30 ते 10.30 कीर्तन कार्यक्रम असा दैनंदिन समावेश आहे. आश्रम लासुरा फाटा शेगाव खामगाव रोड वर असल्याने येणारे जाणारे, नागरिक हे दृष्य बघणारांचे लक्ष वेधून घेत आहेत. शेगाव मार्गावरिल दिंड्या पालख्या आश्रमा वरील देखावे पाहून आणि त्यांचे अवलोकन करुन थक्क होत आहेत. आश्रमा मध्ये भागवत कथेचे आयोजन सुरु असुन येणाराचे मन प्रसन्न होत आहे.अँड ढगे, कोल्हे सर गजानन भाऊ ढोले सर्व विश्वस्थ डोसे सर सोपान पाटील व गणेश दादा मित्र मंडळ परिश्रम घेत आहेत.
