November 20, 2025
बुलडाणा

संतप्त महिलांनी नालीचे घाण पाणी आणून टाकले नगरपरिषद कार्यालयात

खामगाव : नाल्यांची सफाई वेळोवेळी मागणी करूनही होत नसल्याने त्रस्त झालेल्या महिलांनी आज बुधवारी खामगाव नगर परिषदेच्या कार्यालयामध्ये नालीचे घाण पाणी आणून फेकल्याने एकच खळबळ उडाली. यावेळी पोलिसांना पाचारण करण्यात आले होते. खामगाव येथील दाळफैल भागात प्रभाग क्र 11व 12 मधील गावणे चककी पासून ते मस्तान चौक भागात मागील काही दिवसांपासून नाल्यांची सफाई नरक पालिके मार्फत केला जात नाही याबाबतच्या तक्रारी या भागातील नागरिकांनी अनेक वेळा केल्यानंतरही तक्रारींकडे दुर्लक्ष केले जात असल्याने आज बुधवारी या भागातील संतप्त महिलांनी नगरपरिषद कार्यालयावर पोहोचून रोष व्यक्त करीत सोबत आणलेले नाल्यातील घाण पाणी नगरपरिषद कार्यालयामध्ये आणून टाकले.यामुळे एकच खळबळ उडाली आहे.कोरोना व्हायरस चा प्रभाव वाढत असताना प्रशासनाने स्वच्छता राखण्याचे आव्हान केलेले असताना सुद्धा नगरपालिकेच्या नाल्या घाण कचऱ्याने तुडुंब भरले असल्याने या भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे.

Related posts

प्रेमात जीव देण्याची धमकी देत व्हाट्सॲपवर अश्लील व्हिडीओ व्हायरल करून विध्यार्थीनीची बदनामी : तरुणाविरुद्ध गुन्हा

nirbhid swarajya

शासनाच्या एचआयव्ही निर्मूलनासाठी राबवलेल्या पीपीटीसीटी कार्यक्रमाचे सुयश…जिल्ह्यात नवजात बालकात एचआयव्ही चे प्रमाण शून्य.

nirbhid swarajya

माजी आ.सानंदा यांना येणार अच्छे दिन- ना.विजय वडेट्टीवार

nirbhid swarajya
error: Content is protected !!