मलकापूर : सध्या संपुर्ण राज्यात संचारबंदी लागु असतांना बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे नाकाबंदी दरम्यान पोलीसांनी मारुती ईर्टिका कार सह अवैध दारू पकडून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईमधे पोलीसांनी एकुण 8 लाख 55 हजाराच्या मुद्देमालासह दोघा आरोपीना ताब्यात घेतले आहे.
संपुर्ण राज्यात सध्या कोरोना या आजाराने हाहाकार माजविला आहे यावर खबरदारी म्हणून संचारबंदी लागु करण्यात आली आहे. या संचारबंदी दरम्यान शहरात नाकाबंदी सुरू असतांना मंगळवारी मध्यप्रदेशातील बऱ्हाणपुर येथुन औरंगाबाद कडे जाणाऱ्या एका मारुती ईर्टिका कार MH 20 FG 4789 या वाहनात अवैध दारूची वाहतुक होत असल्याच निदर्शनास आले आहे. याबाबतची फिर्याद शहर पोलिस स्टेशनचे ऐ. एस. आय. नरेंद्र सिंग ठाकूर बक्कल नं. 1028 यांनी शहर पोस्टेला दिली. फिर्यादीवरून औरंगाबाद येथील संत तुकाराम होस्टेलच्या बाजूला राहणारे मनोज हिरालाल सोने, सचिन नारायण रमंडवाल दोघे रा.पदमपुरा औरंगाबाद यांचेकडून 55 हजार रुपयांची बाॅम्बे स्पेशल, ओ.सी, व्हिस्की व विदेशी दारुसह आठ लाख रुपये किंमतीची मारुती ईर्टिका कार असा एकूण आठ लाख पंचावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.