TV9 चा पत्रकार असल्याची पोलिसांना दिली माहिती
खामगांव : देशासह संपुर्ण महाराष्ट्रामधे कोरोना वायरस ने धुमाकुळ घातला आहे. या कोरोना वायरसचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणुन दिनांक 23 मार्च पासुन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संचारबंदी व जिल्हाबंदी लागु केली आहे. या संचारबंदीच्या आदेशाचे पालन न करता लोक सुट्टी असल्यासारखे शहरात फिरताना दिसत आहे. लोकांनी घरी राहावे यासाठी पोलिस प्रशासनाने जनजागृती सुरु केली होती व तशा प्रकारे शहरातून लाउडस्पीकरवर लोकांना सुचना सुद्धा देण्यात येत होत्या, मात्र लोकांमधे यांची कुठेही जागरूकता दिसत नसल्यामुळे पोलिसांना एक्शन मोड मधे येऊन विनाकारण फिरणाऱ्या लोकांना “प्रसाद” द्यावा लागत आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील खामगांव मध्ये SDPO प्रदीप पाटील व पथकाचे पोलिस दुपारी गस्ती वर असताना चिखली बायपास जवळील हॉटेल अजिंक्य जवळ एक चारचाकी गाड़ी उभी दिसली व त्यामध्ये दोन व्यक्ती बसलेले होते. त्यामुळे चौकशी केली असता त्यातील एक व्यक्ती उड़वा उडवी चे उत्तर देत होता, तोच पोलिसांनी आपल्या ख़ाक्या दाखवल्या असता आपल्या मोठ्या भावासोबत गाड़ी फायनान्स करायला आलो होतो असे सांगून TV9 चे खोटे ओळखपत्र दाखवून दिशाभुल करत होता.या वेळी पोलिसानी त्याला चांगलाच प्रसाद दिला व SDPO प्रदीप पाटील यांनी सदर व्यक्तीस ताकीद देऊन सोडून दिले.