ग्रामपंचायत स्तरावरील ऑनलाइन कामे राहणार बंद
खामगाव : महाराष्ट्र राज्यातील सर्व ग्रामपंचायत मध्ये आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पातील संगणक परिचालकांनी न्याय मागण्यासाठी १७ नोव्हेंबर आज पासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे.आपल्या मागण्या त्वरित मान्य करण्याची मागणी ग्रामविकास मंत्राकडे निवेदनाद्वारे केली आहे.निवेदनानुसार आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पातील मागील १२ वर्षापासून ग्रामपंचायत स्तरावर ग्रामविकास विभागात नेमून दिलेले काम संगणक परिचालक करत आहे. ग्रामीण भागातील सुमारे सात कोटी जनतेला विविध प्रकारच्या सेवा देण्याचे काम संगणक परिचालक अविरतपणे करत आहे. ग्रामपंचायतीची ऑनलाईन व ऑफलाइन देखील काव्यते करतात त्यांना ६९३० रुपये इतके तटपुंज मानधन तेही वेळेवर मिळत नाही संगणक परिचालक ग्रामपंचायतीमध्ये बसून सर्व प्रकारचे कामे करत असल्याने त्यांना कर्मचारी म्हणून दर्जा व किमान वेतन मिळणे आवश्यक असून ग्राम विकास विभागाने स्थापन केलेल्या यावलकर समितीने २०१८ मध्ये या सर्व संगणक परिचालकांना ग्रामपंचायतीच्या सुधारित आकृती पदनिर्मिती करण्याची शिफारस केली आहे. शासनासर्व योजना नागरिकांना ऑनलाइन देण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे ग्रामपंचायत स्तरावर डेटा एन्ट्री ऑपरेटर संगणक परिचालक या पदाची कायमस्वरूपी निर्मिती करून किमान वेतन देणे आवश्यक आहे.मात्र शासन व प्रशासन वेळ काढून पणा करत असल्याचे दिसून येत.त्यामुळे शासनाने मागण्या मान्य करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.या निवेदनावर खामगाव तालुक्यातील संगणक परिचालक शुभम लांडे,विशाल जैन,पवन ठाकरे,अनंता शेळके, विनायक देशमुख,अमोल गासे, महादेव मेतकर,आकाश ढोरे,सतीश बहुरूपी, सचिन वानखडे,गणेश निमकार्डे,आदींच्या साह्य आहेत.