शेगाव : येथील श्री संत गजानन महाराजांचे मंदिर पुढील आदेशापर्यंत श्रींच्या दर्शनासाठी बंद करण्यात आली असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशाचे पालन करीत संस्थानने हा निर्णय घेतला आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोरोना विषाणूने पुन्हा आपले डोके वर काढायला सुरूवात केली असून विदर्भामध्ये अमरावती, अकोला, वाशीम, यवतमाळ, बुलढाणा या जिल्ह्यात कोरोना चे पेशंट दिवसेंदिवस वाढत आहेत. मात्र कोरोनाचा वाढता आलेख पाहून अमरावती विभागीय आयुक्तांनी नियम व अटी लागू करत काही जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू केली आहे. या आदेशानंतर आज संध्याकाळी बुलढाणा जिल्हाचे जिल्हाधिकारी एस.राममूर्ती यांनी आदेश काढले आहेत. ज्यामध्ये आज रात्री पासून संपूर्ण जिल्ह्यात सायंकाळी ५ वाजेनंतर अत्यावश्यक सेवा वगळून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. श्री संत गजानन महाराज संस्थान हे घेतलेल्या निर्णय निर्णयामुळे उद्या भक्तांनी काढलेल्या पासेस रद्द करण्यात आले आहेत.
previous post