शेगाव-: श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा मेळावा दिनांक १४ आणि १५ जानेवारीला महाविद्यालयाच्या नवीन सभागृहात आयोजित केला आहे.दरवर्षी या मेळाव्याचे आयोजन महाविद्यालातर्फे केले जाते.महाविद्यालयाचे विद्यार्थी देशाच्या कानाकोपर्यात तसेच परदेशात विविध क्षेत्रांमध्ये मोठ-मोठ्या पदांवर कार्यरत आहेत तर काहींचे स्वतःचे उद्योग आहेत.
माजी विद्यार्थी मेळाव्यादरम्यान अनेक विद्यार्थी एकत्र येणार आहेत. त्यांना सध्या शिकत असलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधता येणार आहे तसेच मार्गदर्शन करता येणार आहे. उद्योग जगतामध्ये होणारे बदल ते अवगत करून देतील. त्यामुळे महाविद्यालयात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना त्यानुसार तयारी करता येईल जेणेकरून नोकरीच्या संधी उपलब्ध होतील.हा मेळावा म्हणजे शिक्षण संपल्यानंतर महाविद्यालयाला भेट देण्याची संधी असते. या निमित्ताने अनेक जुन्या मित्रांशी भेटीगाठी होतात.माहितीची आदान-प्रदान होते. माजी विद्यार्थी एकत्र येऊन ऋणानुबंध निर्माण होतात.कार्यक्रमात माजी विद्यार्थ्यांचे मनोगत,तसेच त्यांचा आता शिकत असलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद, सांस्कृतिक कार्यक्रम ई.चा समावेश होतो.महाविद्यालयातर्फे सर्व माजी विद्यार्थ्यांना ई-मेल, संदेश, कॉल द्वारे निमंत्रित करण्यात आले आहे. त्यांना निवास, भोजन, तसेच इतर सर्व आवश्यक सुविधा पुरविल्या जातात.आतापर्यंत जवळपास ६०० माजी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून अजूनही नोंदणी प्रक्रिया सुरु आहे. यामध्ये अनेक विद्यार्थी जे परदेशात जसे की अमेरिका, जर्मनी, दुबई येथे नोकरी करत आहेत त्यांचाही समावेश आहे. कित्येक माजी विद्यार्थी आपल्या कुटुंबासोबत येऊन सहभाग दर्शवतात. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाकडून जय्यत तयारी सुरु आहे.
महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी अधिक संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच माजी विद्यार्थी कक्षाचे समन्वयक यांनी केले आहे.