खामगाव: गेल्या दोन वर्षांनंतर कावड उत्सव साजरा करण्यात आला असून यावर्षी शेवटच्या सोमवारी चांगदेव मुक्ताबाई येथून जल घेऊन कावडधारी शिभक्त कावड घेऊन कावड मंडळ शहरात दाखल झाले होते यानिमित्त कावडधारी भाविकांना साबुदाण्याची उसळ वितरीत करण्यात आली.सुटाळा येथील महादेव मंदिर येथे कावडधारी शिवभक्तांनी जलाभिषेक करून महादेवाची पूजाअर्चना करून उत्सव भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला.यासाठी खामगाव येथील विविध कावडधारी मंडळांनी भाग घेतला.कावड मंडळ हे चांगदेव मुक्ताबाई येथून नांदुरा मार्गे सुटाळा वरुन खामगाव संपूर्ण शहरात मिरवणूक काढतात.सुटाळासह संपूर्ण खामगाव शहर भक्तीमय होते.सुटाळा येथे महादेव मंदिरात दर्शनासाठी दूरवरुन शेकडो भाविक दिवसभर गर्दी करतात.सकाळी ६ वाजता पासूनच श्री राम संस्थान सुटाळा खुर्द तर्फे उसळ वाटपाचे आयोजन करण्यात आले होते.कावडनिमित्त कावड घेऊन येणाऱ्या कावडधारी व भाविकांसाठी साबुदाणा उसळ तयार करण्यात आली होती. उसळ वाटण्याकरीता श्री राम संस्थानचे पदाधिकारी सचिन ठाकरे,अरुण डोंगरे,काशीराम भोपळे,बळीराम दांडगे,तुळशीराम बोदडे,अजय बोचरे,राजेश,जवरे,प्रल्हाद रोठे,सुधीर सुर्वे,गणेश इंगळे, रामेश्वर बोदडे,व सुटाळा खुर्द गावकरी यांनी परीश्रम घेतले.कावडधारी व स्थानिक भाविकांनी साबुदाणा उसळीच्या प्रसादाचा लाभ घेतला.