नांदुरा: श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती द्वारा संचालीत, श्री पुंडलिक महाराज महाविद्यालय, नांदुरा रेल्वे येथे “आझादी का अमृतमहोत्सव” तसेच स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून सोमवार, दि. १५/०८/२०२२ रोजी महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉ. दिलीपजी हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. अलका मानकर, IQAC समन्वयक प्रा. डॉ. स्मिता तराळे यांच्या उपस्थितीत रेड रिबन क्लब, नांदुरा व रा. से. यो. एकक यांच्या संयुक्त विद्यमाने एच आय व्ही- एड्स जनजागृती शिबिर आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीपजी हांडे होते. कार्यक्रमाला रेड रिबन क्लब, नांदुरा चे अधिकारी श्री. संदीप गोंड आणि श्री. उमरकर हे प्रमुख पाहुणे होते.
प्रमुख पाहुणे श्री. संदीप गोंड यांनी उपस्थित सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींना एच.आय.व्ही-एड्स या रोगाविषयी जनजागृतीपर व्याख्यान दिले. या रोगाविषयी असणारे समज-गैरसमज, एच. आय. व्ही. होण्याचे कारणे. विवाहपूर्व एड्स चाचणी करणे किती महत्त्वाचे आहे, याविषयी मार्गदर्शन केले. एक सजग, सतर्क व विवेकशील युवा निर्माण करण्यासाठी रा. से. यो. मधील अशा अनेक कार्यक्रमाचे योगदान महत्वपूर्ण आहे, असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉ. दिलीपजी हांडे यांनी केले.
याप्रसंगी प्रा. डॉ. प्रतिभा आत्राम, प्रा. डॉ. रविकुमार शिंदे, प्रा. डी. एम. गायकवाड, प्रा. डॉ. महेश मुळूक, प्रा. डॉ. सुचिता दिघे, प्रा. डॉ. सचिन मुखमाले, प्रा. अमोल निपटे, प्रा. तेजस्विनी मारकवाड, प्रा. सुनिल चव्हाण, प्रा. सचिन जाधव, तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रा. से. यो. कार्यक्रम अधिकारी प्रा. शांताराम भोये यांनी केले. सुत्रसंचालन रा. से. यो. महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. सुनंदा डेकाटे यांनी केले. तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन रसायनशास्त्राचे प्रा. निलकेश धुर्वे यांनी केले.
खामगाव चिखली जळगांव जामोद जिल्हा नांदुरा बातम्या बुलडाणा ब्लॉग मलकापूर महाराष्ट्र मेहकर मोताळा विदर्भ शेगांव संग्रामपूर सामाजिक सिंदखेड राजा