खामगांव : खामगांव येथील श्री नवयुवक मानाच्या कावड यात्रा मंडळाच्या वतीने वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबविले जात असतात. त्याच अनुषंगाने सध्या सुरू असलेल्या नवरात्रोत्सवात हजारो भावीकांचे श्रध्दास्थान असलेल्या घाटपुरी येथील श्री. जगदंबा मातेच्या दर्शनाकरीता येणार्या भाविकांकरीता ९ दिवस २४ तास थंड पाण्याची व्यवस्था करण्यात आली असून या सोबतच भावीकांकरीता उद्या दि. १९.१०.२०२३, गुरूवार रोजी सायंकाळी ४ ते १० या वेळेत फराळ (उसळ) वाटप करण्यात येणार आहे तसेच दि. २०.१०.२०२३, शुक्रवार रोजी सकाळी ६ ते १२ वाजेपर्यंत आणि सायंकाळी ४ ते १० या वेळेत चहा वाटप करण्यात येणार आहे. त्याच प्रमाणे शनिवार आणि रविवारी देखील विविध खाद्यपदार्थांचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच श्री नवयुवक मानाच्या कावड यात्रा मंडळाच्या वतीने नुकत्याच सुरू करण्यात आलेल्या रूग्णसेवेच्या माध्यमातून भावीकांचे सेवेकरीता २४ तास रूग्णवाहिका सुध्दा उपलब्ध ठेवण्यात आलेली आहे. रूग्णवाहिका सेवा हवी असल्यास मो. नं. ९३७३८४०८४७ (संदिप चंभारे पाटील) यांचेशी संपर्क साधावा. तरी सर्व भाविक भक्तांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री नवयुवक मानाच्या कावड यात्रा मंडळाचे अध्यक्ष राहुलभाऊ कळमकार यांनी केले आहे.