बुलढाणा : जिल्ह्यातील सर्वात जुनी मानाची श्री नवयुवक मानाची कावड यात्रेच्या वतीने या वर्षी पासुन धार्मिक कार्यक्रमासोबत सामजिक उपक्रम रावबिण्याचा संकल्प कावडयात्रे चे सर्वेसर्वा अध्यक्ष राहुल भाऊ कळमकार यांच्या संकल्पनेतुन निःशुल्क शववाहिका शवपेटी ,व्हील चेअर, कमोड चेअर,वॉकर इत्यादी वैद्यकीय साहित्य गरजुना पुरविण्यात येणार आहे या सेवेचा शुभारंभ सोमवार ११ सप्टेंबर २३ रोजी सकाळी ११ वाजता नांदुरा रोड हॉटेल गौरव जवळ होणार आहे श्री नवयुवक मानाची कावड ८ सप्टेंबर २३ रोजी दुपारी १ वाजता दालफैल भागातुन श्री तीर्थक्षेत्र चांगदेव मुक्ताबाई येथे पवित्र जल आणण्यासाठी रवाना होणार आहे तर ११० किलोमीटर चा पायी प्रवास करून चौथा श्रावण सोमवार ११ सप्टेंबर २३ रोजी सकाळी ११ वाजता कावड यात्रेची शहरातुन भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे या शोभायात्रेत भगवान शंकर याचा तांडव नृत्यांचा जिवंत देखावा निल कल्याणकर हे सादर करणार आहेत तसेच भगवान शंकराच्या ५ वेगवेगळ्या रूपातील भव्य मूर्ती असणार आहे, महिला भाविकांचा लक्षणिय सहभाग असणार,आहे व उज्जेन येथील ढोल पथक,अकोट येथील गंडयार पथक,शहरातील ढोल पथक, सिल्लोड येथील डीजे, हे मुख्य आकर्षण ठरणार आहे ही शोभायात्रा जंलब नाका, टॉवर चौक,अग्रेसन चौक,जगदंबा चौक मोहन चौक, फरशी, राणा गेट, दालफैल,अशी मार्गक्रम करणार आहे या दरम्यान शहरातील मुख्य ५ मंदिरात शिवलींगावर पवित्र जलाभिषेक करण्यात येणार आहे तर राठी प्लॉट मधील महादेव मंदिरात शिवलिंगा वर पवित्र जलाभिषेक करून कावड यात्रे चा समारोप होणार आहे तरी शिवभक्तांनी कावड यात्रा व शोभायात्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आव्हाहन राहुल भाऊ कळमकार यांनी केले आहे
previous post