April 4, 2025
क्रीडा खामगाव जिल्हा बातम्या ब्लॉग महाराष्ट्र मुंबई विदर्भ शिक्षण सामाजिक

श्री जी वी मेहता नवयुग विद्यालयात राष्ट्रीय छात्र सेना च्या वतीने राष्ट्रीय एकता दिवस….

खामगाव: स्थानिक श्री जी वी मेहता नवयुग विद्यालयात राष्ट्रीय छात्र सेना च्या वतीने राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यात आला यावेळी संपूर्ण कॅडेट्स नी २०० मिटर धावुन राष्ट्रीय एकतेचे प्रदर्शन केले. राष्ट्रीय एकता दौड दरम्यान राष्ट्राचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेला आदरांजली वाहण्यात आली.यावेळी एनसीसी ऑफिसर गणेश घोराळे यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्याची माहिती देऊन त्यांना लोहपुरुष का म्हणत व राष्ट्रीय एकात्मते चे वल्लभभाई पटेल कशे पुजारी होते या विषयी माहिती दिली.१३ महाराष्ट्र बटालियन चे कमांडींग ऑफिसर कर्नल अमित भटनागर यांच्या सुचनेवरुन व आरएम धर्मेंद्र सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली एनसीसी चे केअरटेकर ऑफिसर गणेश घोराळे यांनी कॅडेट्स ना राष्ट्रीय एकतेची शपथ दिली.यावेळी प्राचार्य सुनील जोशी,एनसीसी कॅडेट्स, शालेय कर्मचारी उपस्थित होते.

Related posts

विदर्भात शेतकऱ्यांकडून बियाणांची खरेदी

nirbhid swarajya

बारादरी भागात पाणपोईचे उद्घाटन

nirbhid swarajya

व्दारका हॉस्पीटल येथे २४ जानेवारी रोजी निशुल्क रोगनिदान व उपचार मार्गदर्शन शिबिर

nirbhid swarajya
error: Content is protected !!