बुलडाणा : अयोध्या येथे उद्या 5 ऑगस्ट रोजी श्रीराम मंदिराचे भूमिपूजन असल्याने कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कलम 37 (1 व 3) जारी केले असून, त्यामुळे उद्या सकाळी 6 ते रात्री 9 पर्यंत अनेक बंधने पाळावी लागणार आहेत. या बंधन व नियमांचे उल्लंघन करणार्याविरुद्ध कठोर कारवाई केली जाणार आहे.
कलम 37 (1) व (3) लागू केल्यामुळे जिल्ह्यात लोकांना सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर, चौकात एकत्र येता येणार नाही. कुठेही सार्वजनिक ठिकाणी, चौकात प्रतिमा पूजन, आरती, घोषणा देणे व फटाके फोडता येणार नाहीत. स्थानिक श्रीराम मंदिरात होणारे पूजाअर्चा, अभिषेक आदी कार्यक्रम पुरोहित, पुजारी आदी 3 ते 5 यांच्या मर्यादित संख्येत करावे लागणार आहेत. सार्वजनिक ठिकाणी श्रीराम प्रतिमा पूजन, आरती, महाआरती, कारसेवक सत्कार आदी कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे. अंत्ययात्रेच्या व्यतिरिक्त कोणत्याही मिरवणुका रस्त्यावरून ओळीमधून नेण्यासाठी स्थानिक ठाणेदारांची लेखी परवानगी आवश्यक आहे.
सदर आदेशात कोणत्याही प्रकारे सार्वजनिक कार्यक्रमास परवानगी देऊ नये व त्याची अंमलबजावणी करण्यासंदर्भात सूचित केल्या गेले आहे.मात्र सोशल मीडियावर हा आदेश वायरल झाल्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. सदर आदेशामधे फक्त सार्वजनिक कार्यक्रमावर व इ. वर बंदी घालण्यात आली आहे. मागील आदेशाप्रमाणे सर्व सकाळी 9 ते 7 पर्यंत सुरू राहणार आहे.
previous post