मेळाव्यात ग्राहकांना विविध ऑफर
खामगांव:-असंख्य ग्राहकांच्या आग्रहास्तव नांदुरा रोड वरील श्रीनिवास होंडाच्या वतीने गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर भव्य लोन व एक्सचेंज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असुन बुधवार दि.23 मार्च 2022 रोजी होंडा मोटर सायकल ,स्कूटर इंडिया कंपनी नागपुरचे सेल्स एरिया मॅनेजर प्रवीण तुरकर यांच्या शुभहस्ते फीत कापून उदघाटन करण्यात आले. यावेळी श्रीनिवास होंडा शो रुमचे संचालक राणा अमेयकुमार सानंदा, श्रीराम फायनान्स चे व्यवस्थापक राहुल कोल्हे, दिपक चौधरी, श्रीनिवास होंडा शो रुमचे व्यवस्थापक अविनाश छंगाणी आदींची उपस्थिती होती.श्रीनिवास होंडाच्या वतीने ग्राहकांसाठी दरवर्षी लोन व एक्स्चेंज मेळाव्याचे आयोजन केले जात असते परंतु मागील दोन वर्षांपासून कोरोनाच्या निर्बंधामुळे हा मेळावा घेण्यात आला नव्हता. यावर्षी येथील भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद मैदान येथे दि. 23 ते 25 मार्च 2022 असे 3 दिवस भव्य लोन व एक्सचेंज मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. या मेळाव्यात कोणत्याही कंपनीची जुनी गाडी घेउन या व होंडा कंपनीची नवीन गाडी घेउन जा अशी ऑफर ग्राहकांसाठी ठेवण्यात आली आहे. सोबतच ग्राहकांना कमीत कमी आवश्यक कागदपत्रे जमा करुन ,कमीत कमी डाऊन पेमेंट भरावे लागणार आहे , ग्राहकांकरिता एक्सचेंज बोनस म्हणून 2000 रुपयांची सूट , नवीन गाडी खरेदीवर ग्राहकांना हेल्मेट फ्री , अश्या विविध ऑफर दिल्या जात आहे. तसेच या मेळाव्यामध्ये ग्राहकांसाठी सर्व फायनान्स कंपनीच्या सुविधा जागेवर उपलब्ध करुन देण्यात आल्या आहे तरी ग्राहकांनी या एक्सचेंज मेळाव्याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्रीनिवास होंडा शो रुमचे व्यवस्थापक अविनाश छंगाणी यांनी केले आहे.