खामगाव: तालुक्यात यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला म्हणून सातत्याने पर्जन्यमान झाल्याने भूजल पातळी चांगलीच सुधारली आहे.उन्हाळ्यातील सिंचनासह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची सोय होईल व भूजल पातळी वाढवण्यास मदत होईल शेतकरी तसेच गावातील लोकांना याचा मोठा फायदा होईल याकरिता ओढे-नाल्या मधून वाहून जाणारे पाणी रोखण्यासाठी लोकसहभागातून वनराई बंधारा उमरा येथे बांधण्यात आला कार्यक्रमाला सर्व गावकरी तसेच सरपंच सौ मीरा राजेंद्र अंभोरे,तालुका कृषी अधिकारी,मंडळ कृषी अधिकारी,पोलीस पाटील श्री किशोर अंभोरे पाटील तसेच गावातील शेतकरी व नागरिक तसेच ग्रामपंचायत सदस्य उमरा गावातील सामाजिक कार्यकर्ते व मोठ्या प्रमाणात गावकरी उपस्थित होते.