October 5, 2025
खामगाव

शॉर्ट सर्किटमुळे दोन वाहने जळून खाक

खामगांव : खामगांव येथील गजानन कॉलनी भागातील शिक्षक इंगळे यांच्या घरा समोर टाटा मॅजिक व दुचाकीला आग लागल्याची घटना ३ मे रोजी दुपारच्या सुमारास घडली. अंकुश हटकर यांच्या उभ्या असलेल्या टाटा मॅजिक एम एच २८ आर २९३४ वाहनाला अचानक आग लागली. यामध्ये गाडी पूर्णपणे जळुन खाक झाली तर बाजूला उभी असलेली दुचाकी क्र. एम एच २८ एडी १८९२ सुद्धा जळाली आहे. स्थानिक नागरिकांच्या लक्षात येताच ही आग विझवण्यात आली. या आगीमध्ये कुठलीही जीवित हानी झाली नसून दोन्ही वाहनांचे लाखोंचे नुकसान झाले असल्याची माहिती अंकुश हटकर यांनी दिली आहे. ही आग शॉर्ट सर्किट मुळे लागली असल्याची माहिती मिळाली आहे.

Related posts

संपुर्ण पोलिस स्टेशनच क्वारंटीन!

nirbhid swarajya

कृ.उ.बा.समिती संचालक पदी गणेश माने व उमेश चांडक यांची निवड

nirbhid swarajya

कृउबास व्यापारी राजेश टावरी यांची आत्महत्या

nirbhid swarajya
error: Content is protected !!