बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आवाहन!
बुलडाणा : दि.10 ऑगस्ट पासून 17 ऑगस्ट 2020 या कालावधीमध्ये बुलढाणा जिल्ह्यात विविध ठिकाणी भरपूर प्रमाणात पाऊस झालेला आहे. पावसामुळे बऱ्याच ठिकाणी पाणी साचून पिकांचे नुकसान झाले आहे, तसेच पाण्याच्या प्रवाहामुळे जमीन खरडून देखील केली आहे याच बरोबरीने काही ठिकाणी धरणातील पाण्याचा साठा पूर्ण भरल्याने धरणाचे दरवाजे उघडले गेले आहे, त्यामुळे नदीकाठच्या शेतीमध्ये देखील पाणी जाऊन पिकाचे नुकसान किंवा जमीन खरडून गेली असणार आहे, तरी सर्व शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा किंवा जमीन खरडून गेल्याचा नुकसानी अहवाल आपल्या गावातील कृषी सहाय्यक,तलाठी, ग्रामसेवक यांच्याकडे द्यावा.ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला आहे त्यांनी क्रॉप इन्शुरन्स एप्लीकेशन (crop insurance App) या मोबाईल ॲप द्वारे आपले नुकसान नोंदवावे. याकरिता गुगल प्ले स्टोअर वर जाऊन वरील ॲप डाऊनलोड करावे वरील ॲप डाऊनलोड करणे शक्य न झाल्यास कृषी सहाय्यक यांच्याकडून नुकसान नोंदणीकरिता सूचना पत्राचा फॉर्म प्राप्त करून घेऊन फॉर्म भरून कृषी सहाय्यक यांच्याकडे नुकसान झाल्यापासून 72 तासात देण्यात यावा असेही डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी सांगितले.