शेगाव : बुलडाणा जिल्ह्यात शेतकऱ्यांनी सुरुवातीला दुबार पेरणी केली नंतर कोरोनाच्या काळात गेल्या काही दिवसात मुसळधार पाऊस झाला त्यामुळे शेगाव तालुक्यातील जवळा बु, तिंत्रव, गव्हाण, वरूड, गायगाव बु , कनारखेड, लासुरा बु, टाकळी हाट, टाकळी विरो, चिंचोली कारफार्मा, सवर्णा, खेर्डा, गौलखेड, आळसणा, टाकळी धारव, तिव्हाण, जानोरी, या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने परिसरात नदी, नाल्यांना पुर आल्याने शेतातील माती खरडून गेली. यंदाच्या वर्षात प्रथमच नदी, नाले तुडूंब भरून वाहले.
पावसाच्या पाण्याने अनेक ठिकाणी शेती खोडून गेल्याने शेतात पेरलेले सोयाबीन, कपाशी आदि पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात अधिकाऱ्यांनी जाऊन शेताची पाहणी करुन सर्वे करावा व त्याचा मोबदला शासनाने द्यावा अशी मागणी शेतकरी करीत आहे.