जलंब : जलंब तालुक्यातील माटरगाव येथे बुधवारी रात्री नऊच्या दरम्यान मुसळधार पावसाने विठ्ठल सोनोने यांच्या माटरगाव – भास्तन रोड वर असलेल्या शेतात पाणी शिरले त्यामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विठ्ठल सोनोने यांनी आपल्या ४ एकर शेतात तूर आणि सोयाबीन या पिकाची पेरणी केली होती.
मात्र काल मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला असल्यामुळे आजूबाजूच्या शेतातून वाहत येणाऱ्या पाण्याने शेतालगत असलेल्या रस्त्याचे बांधकाम सुरू आहे व तेथे पुलाचे बांधकाम सुरू आहे त्यामुळे पाणी शेतात शिरल्याने पिकाचे नुकसान झाले आहे. संबंधित ठेकेदाराला वारंवार सांगून देखील याकडे ते लक्ष देण्यास तयार नाही त्यामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून शासनाने तात्काळ मदत द्यावी अशी मागणी विठ्ठल सोनोने या शेतकऱ्याने केली आहे.