खामगाव : शेलोडी शिवारातील सोगुंण ठेवलेल्या सोयाबीन च्या गंजीला कोणीतरी अज्ञात इसमाने काल रात्रीच्या दरम्यान पेटवून दिल्याची घटना घडली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहीतिनुसार शेलोडी शिवारातील संतोष सुखदेव तायडे यांनी गावातील शेत ठोक्याने करण्यात साठी घेतले आहे.त्यानी यावर्षी ८ एकर परिसरातील सोयाबीन या पिकांची लागवड केली होती. हे सोयाबीन काढणीला आले असता त्यानी काल दिवसभर शेतातील सोयाबीन काढले व यांची शेतात गंजी मारून झाकून ठेवली होती. तर रात्रीच्या दरम्यान कोणीतरी अज्ञात इसमाने रात्री ११ वाजताच्या सुमारास शेतातील सोयाबीन ची गंजी कोणीतरी अज्ञात इसमानी पेटवून दिली. गावातील काही लोकांना आग लागलेली वधु निघताना दिसून आल्यावर सर्वांनी शेताकडे धाव घेतली व आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र आग लागून बराच वेळ झाल्यामुळे आग विझवता येऊ शकली नाही.यामध्ये शेतकरी तायडे यांचे दोन लाखाचे नुकसान झाले आहे याप्रकरणी संतोष सुखदेव तायडे यांनी ग्रामीण पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध भादवि कलम ४३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकाँ मनोहर कोल्हे हे करीत आहेत.