खामगाव:शेतात ठेवलेले दोन लाखाचे सोयाबीन चोरट्यांनी लंपास केल्याची घटना खामगाव अकोला मार्गावरील टेंभुर्णा शिवारात उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. स्थानिक सराफा भागातील जैन मदिराजवळील रहिवासी प्रियंशु मोहन गुप्ता (21) यांचे टेंभुर्णा शिवारात राष्ट्रीय महामार्ग क्र. 6 लगत शेत असुन त्यांनी शेतातील गोडाऊन मध्ये 50 किलोग्रॅम वजनाचे 130 सोयाबीनचे कट्टे ठेवलेले होते. 20 नोव्हेंबर 22 रोजी सायंकाळी 5 ते 26 नोव्हेंबर 22 रोजी सायंकाळी 7.30 वाजेदरम्यान अज्ञात चोरट्याने 80 कट्टे सोयाबीन (अं. कि. 2 लाख) लंपास केले. ही बाब प्रियंशु गुप्ता 26 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7.30 वाजताच्या सुमारास शेतात गेले असता त्यांनी गोडाऊन उघडून पाहिले असता व उघडकीस आली. याप्रकरणी प्रियंशु गुप्ता यांनी खामगाव ग्रामीण पोस्टेला दिलेल्या फियादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरूध्द भादवि कलम 454, 457, 461, 380 नुसार गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास पोहेका मनोज चव्हाण करीत आहेत
previous post