खामगाव : खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा जिल्हाध्यक्ष अँड.आकाश फुंडकर यांनी शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील उभे असलेले पीक काढण्याबद्दल परवानगी देण्यात यावी अशी मागणी एका पत्रकाद्वारे केली आहे. सध्या लॉकडाऊन असल्यामुळे संपूर्ण राज्यातील शेतकरी हे त्यांच्या शेतातले पीक काढू शकत नाही.आज जिल्हाभरातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतात गहू हरभरा भुईमूग तूर कांदा हे पीक उभे आहे. येत्या काही दिवसात अतिवृष्टीची किंवा अवकाळी पाउस होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला जाऊ नये यासाठी त्यांना तात्काळ, पीक काढण्यास परवानगी देण्यात यावी व कोरोना साठी आखून दिलेल्या नियमांची अंमलबजावणी करून शेतातील माल काढण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा जिल्हाध्यक्ष भाजपा अँड. आकाश फुंडकर यांनी केली आहे.
previous post