बुलडाणा : बुलडाणा जिह्यातील मेहेकर तालुक्यातील डोणगाव येथे गत महिन्यापासून कागदपत्राची पूर्तता करूनही शेतकऱ्यांना बँक प्रशासनाच्या वेळकाढूपणामुळे आतापर्यंतही पीककर्ज वाटप करण्यात आलेले नाही, एवढया वरच नव्हे तर सर्व कागदपत्र दिल्यानंतर फेरफार साठी बँकेकडून शेतकऱ्यांची अडवणूक केल्या जात आहे त्यामुळे बळीराजा दररोज बँकांच्या भोवती पिककर्जासाठी फेर्या मारताना दिसून येत आहे अशातच मेहेकर परिसरात पावसाने दांडी मारल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उभे असताना शासनाचे आदेश असताना सुद्धा बँका शेतकर्यांना पीककर्ज वाटप करीत नसल्याचे दिसून आले आहे
यासंदर्भात किसान सेनेचे उपजिल्हा प्रमुख तथा माजी पंचायत समिती सभापती सागर पाटील यांनी घाटबोरी येथील महाराष्ट्र बँक जानेफळ येथील स्टेट बँक डोणगाव येथील स्टेट बँक गाठून बँक व्यवस्थापकांना धारेवर धरून महिना उलटूनही आपण शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी का हेलपाटे मारावे लागत आहेत असा प्रश्न करून त्वरित शेतकऱ्यांना शासनाच्या निर्देशानुसार ३० जून च्या आत कर्जवाटप करा अन्यथा आम्हाला शेतकरी हितासाठी आंदोलन करावे लागेल असा इशारा त्यांनी दिला आहे