January 1, 2025
आरोग्य खामगाव जिल्हा बुलडाणा महाराष्ट्र मुंबई विदर्भ शेतकरी

शेतकऱ्यांना ई – पीक पाहनी नोंदणी चे प्रशिक्षण स्वत: देता येणार

माहिती अधिकारी करणार मार्गदर्शन

खामगांव (उमाका): पीक पेरणीची माहिती मोबाईलवरील अॅपद्वारे गाव नमुना क्रमांक १२ मध्ये देण्यासाठी स्वत: शेतकऱ्यांना उपलब्ध करुन देण्याकरीता खामगांव तालुक्यात ई – पीक पाहणी कार्यक्रम राबविण्यास सुरुवात झाली. तालुक्यातील पळशी, लखनवाडा, पिंपरी देशमुख व इतर शिवारातील शेतक:यांना उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ई – पीक पाहणीबाबत प्रशिक्षण देण्यात आले. आता तलाठयांऐवजी शेतकऱ्यांना ई – पीक पाहणी मोबाइल अॅप डाउनलोड करुन खातेदार म्हणून नोंदणी करता येणार आहे. या अॅपवर पीक पेरणीची माहिती भरुन पिकांचा फोटोही अपलोड करता येणार आहे. १४ ऑगस्टपासून ई – पीक पाहणी डेमो अॅप उपलब्ध करुन देण्यात आले. १५ ऑगस्टपासून ई – पीक पाहणी अॅप शासन स्तरावरुन उपलब्ध झाले आहे.

पीक पेरणी अहवालाचा रिअल टाइम क्रॉप डाटा संकलित होण्यासाठी पीक पेरणी अहवाल प्रक्रियेत शेतकऱ्यांचा सक्रिय सहभाग घेण्यात येत आहे. पीक पेरणीबाबतची माहिती या अॅपद्वारे गाव नमुना क्रमांक १२ मध्ये नोंदविण्यासाठी व शेतकऱ्यांनी स्वत: उपलब्ध करुन देण्यासाठी फार्मर फ्रेंडली अॅप ट्रस्टने आज्ञावली विकसित केली आहे. तालुक्यातील पळशी, लखनवाडा, पिंपरी देशमुख व इतर शिवारातील शेतकऱ्यांना महसूल व कृषी विभागाच्या वतीने प्रशिक्षण, देण्यात आले. तसेच अजून बरेच शिवारामध्ये सध्या प्रशिक्षण सुरू आहे.

याप्रसंगी कृषी विभागाचे उपविभागीय अधिकारी खामगाव प्रभारी तहसीलदार राहुल तायडे, महसूलचे नायब तहसीलदार अश्विनी नेमाने, मंडळ अधिकारी, तलाठी, कृषी विभागाचे कर्मचारी ,पोलीस पाटील, शेतकरी बांधव प्रामुख्याने उपस्थ्ति होते. शेतकरी पीक पेरा नोंदवून फोटो अपलोड करणार असल्याने अचूकता येणार आहे. खरीप हंगामातील अचूक क्षेत्र कळणार आहे. पाकाखालील क्षेत्राच्या अचूक नोंदीमुळे भरड धान्य खरेदीतील गैर व्यवहाराला आळा बसेल व शासनाच्या निधीचीही बचत होणार आहे असे प्रतिपादन महसुलचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव यांनी केले आहे.

Related posts

भर उन्हाळ्यात पुर्णा नदित सोडण्यात आले पाणी…

nirbhid swarajya

विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यासाठी भाजयुमो व विद्यार्थी आघाडीच्या वतीने तहसीलदारांना निवेदन

nirbhid swarajya

खामगावात कोरोना रुग्णांसाठी ४० बेडची अतिरिक्त व्यवस्था येत्या १० दिवसात :आ. फुंडकर

nirbhid swarajya
error: Content is protected !!