April 4, 2025
शेतकरी

शेतकऱ्यांची फसवणूक-महिलांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ भाजपा चे धरणे आंदोलन

शेगाव :जनादेशाचा अपमान करून सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. आघाडी सरकारच्या बेफिकीरीमुळे राज्यात महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. असे आरोप करीत भारतीय जनता पार्टीतर्फे 25 फेब्रुवारी रोजी बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथे तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची फक्त अल्प मुदतीची पीक कर्जमाफी करण्याची घोषणा केली आहे. शेतकऱ्यांची घोर फसवणूक करणाऱ्या व गेल्या महिन्याभरात राज्यातील महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यात अपयशी ठरलेल्या महाविकास आघाडी सरकारचा भाजपा तीव्र निषेध करण्यात आला. यावेळी भाजपचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. आज बुलडाणा जिल्ह्यातील सर्वच तहसील कार्यालय समोर भारतीय जनता पार्टी च्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.

Related posts

ढगाळ वातावरणाचा केळीवर विपरित परिणाम!

nirbhid swarajya

खडकपूर्णा चे 5 दरवाजे उघडले

nirbhid swarajya

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे वीज वितरण कंपनी ग्रामिण आर-१ सेंटरच्या कार्यालयात “ठीय्या आंदोलन”

nirbhid swarajya
error: Content is protected !!