January 6, 2025
चिखली

शेतकरी संघटनेने केले कायदेभंग आंदोलन

चिखली : शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाची स्वातंत्र्य मिळावे  या मागणीसाठी शेतकरी संघटना तंत्रज्ञान स्वातंत्र्य हंगाम साजरा करत आहे. आज दिनांक 12 जून रोजी देशभरात हजारो शेतकऱ्यांनी जीएम बियाण्याची लागवड करून आंदोलनास सुरुवात केली. त्याचाच एक भाग म्हणून बुलडाणा जिल्ह्यातील मंगरूळ नवघरे येथे बाळासाहेब आंबोरे यांच्या शेतात प्रतिबंधित एसटीबीटी कापूस बियाण्याची लागवड करण्यात आली. भारतीय शेतकऱ्यांना जागतिक बाजारपेठेत स्पर्धा करता यावी पिकांचा उत्पादन खर्च कमी व्हावा उत्पादन वाढावे व शेतकऱ्यांचे व देशाचे उत्पन्न वाढावे यासाठी शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीचे बियाणे व तंत्रज्ञान वापरण्याचे स्वातंत्र्य असावे ही शेतकरी संघटनेची जुनी मागणी आहे. अनेक वर्ष सरकारकडे पाठपुरावा करून सुद्धा सरकार जीएम बियाणे वरील बंदी उठवण्यात तयार नसल्यामुळे शेतकरी संघटनेने सविनय कायदेभंगाची हत्यार उपसले आहे मागील वर्षी हजारो लोकांनी एकत्र येऊन एसटीबीटी बियाण्याची लागवड केली होती, शासनाने बंदी न उठल्यामुळे या वर्षी हजारो शेतकऱ्यांनी आपल्या शेतात कपाशी सोयाबीन वांगी मका आदी पिकांचा जाहीर लागवड केली आहे. प्रतिबंधित बियाणे बाळगणे विकणे व लागवड करणे हा कायद्याने गुन्हा आहे व हा गुन्हा करणाऱ्यास तीन वर्ष कैद व एक लाख रुपये दंडाची तरतूद आहे या कायद्याची कल्पना असताना शेतकरी स्वतः कायदे भंग करून गुन्हा दाखल करून घेण्यास तयार आहेत.

हा गुन्हा असेल तर मी गुन्हेगार असे घोषवाक्य या आंदोलनात वापरले जात आहे  हे आंदोलन जिल्हाभर राबविला जात आहे त्याचाच भाग म्हणून मंगरूळ नवघरे येथील उत्कृष्ट शेतकरी बाळासाहेब आंबोरे यांच्या शेतात एसटीबीटी प्रतिबंधित बियाण्याची लागवड शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष देविदास कणखर समाधान पाटील रामदास मुंडे विजय वाघमारे समाधान मुंडे व इतर असे असंख्य शेतकरी यांच्या उपस्थितीत करण्यात आली जीएम बियाना बंदी घालणारा कायद्याला असला तरी कृषी हा राज्य सरकारचा विषय आहे महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठांमध्ये सुरू असलेल्या जीएम बियाण्याच्या चाचण्या फडणवीस सरकारने बंद केल्या होत्या विद्यमान ठाकरे सरकारने किमान पडणे सरकारचा आदेश रद्द करून चाचण्या सुरू कराव्यात अशी मागणी शेतकरी संघटना या आंदोलनाद्वारे करत आहे.

Related posts

जिल्ह्यात वाजणार ग्रामपंचायत निवडणूक चे बिगुल…

nirbhid swarajya

तिबार पेरणी च्या संकटाने शेतकरी दाम्पत्याची आत्महत्या

nirbhid swarajya

खामगाव कृउबास निवडणुकीत महाविकास आघाडी की बिघाड़ी

nirbhid swarajya
error: Content is protected !!