November 20, 2025
खामगाव जिल्हा बुलडाणा राजकीय

शेतकरी संघटनेच्या खामगाव तालुकाध्यक्षपदी प्रफुल्ल उर्फ हेमंत मुंढे पाटील यांची नियुक्ती

खामगांव:शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे नवनियुक्त राष्ट्रीय अध्यक्ष ललितदादा बहाळे हे महाराष्ट्र राज्याच्या दौऱ्यावर असुन ते लांजुड गावाला भेट दिली असता त्यांनी आयोजित शेतकरी सभेमध्ये शेतकरी संवाद साधत असतांना नुकतेच केंद्र सरकारने मागे घेतलेले तीन कृषी कायदे दिल्ली येथे झालेले शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन, रखडलेली कर्जमुक्ती, थकीत वीज बिल आणि राज्य सरकारची सुरु असलेली वीज पुरवठा खंडीत करण्याची मोहीम आणि न मिळालेल्या पिक विमा इत्यादी विषयावर चर्चासत्र तसेच मार्गदर्शन करण्यात आले.या कार्यक्रमात राष्ट्रीय अध्यक्ष ललित बहाळे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा अध्यक्ष,बुलडाणा दामोदरजी शर्मा यांच्या हस्ते शेतकरी संघटनेच्या खामगांव तालुका अध्यक्ष पदी श्री. प्रफुल्ल उर्फ हेमंत मुंढे पाटील रा. खामगांव यांची निवड करण्यात आली.

तसेच शेतकरी संघटनेच्या युवा आघाडी प्रमुख पदावर राहूल पाटील रा. चिखली ता. खामगांव जि. बुलडाणा यांची नियुक्ती करण्यात आली.कार्यक्रमामध्ये प्रमुख उपस्थिती राष्ट्रीय अध्यक्ष ललीत बहाळे पाटील,बुलडाणा जि.अध्यक्ष दामोदरजी शर्मा, युवा आघाडी जि. प्रमुख रणजीतभाऊ डोसे, पुंजाजी देवीकर, वाघुड गाव प्रमुख हरिदास गणबास, मलकापूर शहर अध्यक्ष रमेशसिंग चव्हाण, स्वतंत्र भारत पक्ष जिल्हा प्रमुख बुलडाणा अमृतराव देशमुख, लांजूड, डिगांबर चिंचोले, लांजूड, मनोज पाटील, चिखली बु.,गंगाधर पाटील यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डिगांबर चिंचोले यांनी केले व व्यवस्थापन अमृतराव देशमुख, लांजूड यांनी केले या कार्यक्रमाला लांजुड व चिखली बु व आमसरी गावातील शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Related posts

बोरजवळयात शेतात बिबट्याने केली वासराची शिकार

nirbhid swarajya

मद्यधुंद ट्रक चालकाची दुचाकीला धडक; २ जण जखमी

nirbhid swarajya

प्रिंपि देशमुख येथे पार पडला रजिस्टर मॅरेज

nirbhid swarajya
error: Content is protected !!