जळगांव जा. : अखिल भारतीय किसान सभा ता जळगांव जामोद च्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यलय जळगांव जामोद ह्यांच्या कार्यालया समोर केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा नारेबाजी करीत किसान सभेच्या कार्यर्त्यांनी निषेध नोंदवला तथा सदर प्रकरणात उपविभागीय अधिकारी ह्यांना निवेदन सादर केले. पीककर्ज माफी करून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला पाहिजे,त्यांना नवीन पीककर्ज लगेच बँकांनी द्यावे.तूर,हरभरा शेतकऱ्यांच्या घरात पडलेला असून बंद केलेली खरेदी पुन्हा सुरू करा.घेतलेल्या कृषी मालाचे पैसे विनाविलंब द्या.लॉक डाऊन काळातील वीज बिल पूर्ण माफ करा,वनहक्क कायदायची अमलबजावणी करीत पट्टे द्या.अश्या मागण्याचे निवेदन देत वेळ काळू धोरणाचा निषेध करीत आदिवासी, शेतकरी किसान सभेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करीत सरकारच्या धोरणाचा निषेध नोंदवला. ह्यावेळी किसान सभेचे जिल्हाउपाध्यक्ष कॉम्रेड रामेश्वर काळे, कॉम्रेड विजय पोहनकर, कॉम्रेड शेख जावेद, किसन भैड्या,श्रीराम भैड्या,किसन दामधर,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष एम डी शाबीर, गणेश वानखडे,कैलास राऊत,अश्या 30 कार्यकर्त्यांनी निवेदनावर सह्या करीत निवेदन सादर केले.
previous post