लोणार : संपूर्ण जगभरात कोरोना या संसर्गजन्य रोगाने थैमान घातले असताना कोरोना सारख्या संकटांचा सामना करण्यासाठी पोलीस अहोरात्र आपली सेवा बजावत आहेत त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढावी यासाठी बुलडाणा जिल्ह्यातील शेतकरी पुत्राने आज पोलिसांना अंड्याचे वाटप केले.लोणार तालुक्यातील हिरडव येथील दत्ता पोफळे या शेतकरी पुत्राने आपल्या पोल्ट्री फार्म मधील कडकनाथ कोंबड्यांच्या अंड्यांचे संकलन करून लोणार पोलीस स्टेशन मध्ये पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रत्येक २५ अंड्याचे वाटप करत याप्रमाणे ५० पोलीस बांधवांना १२५० अंड्याचे वाटप करण्यात आले अशी माहिती शेतकरी दत्ता पोफळे यांनी दिली आहे.
next post