अकोला : आपल्या जिद्द व चिकाटीच्या जोरावर सन्मित्र पब्लिक स्कुल ची माजी विद्यार्थीनी प्रिया गोळे अकोल्यातून अव्वल आली आहे. आय आय टी दिल्ली कडून अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या जेईई अँडव्हान्सचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. ह्या परीक्षेत अकोल्यातून सन्मित्र पब्लिक स्कुल माजी विद्यार्थीनी कु. प्रिया बाळकृष्ण गोळे अव्वल आली असून सामान्य श्रेणीत भारतातून 3 हजार 772 वे स्थान मिळवून यश संपादन केले आहे. कु. प्रिया बाळकृष्ण गोळे हिने ओबीसी प्रवर्गात 596 वे स्थान मिळवले आहे. त्यामुळे ती देशातील सर्व आय आय टी सह अन्य संस्था मध्ये प्रवेशास पात्र ठरली आहे.प्रिया गोळे ही मुळची बुलडाणा जिल्ह्यातील शेगांव तालुक्यातील वरुड येथील एका शेतकरी कुटुंबातील आहे.जेईई अँडव्हान्स ही परीक्षा 27 सप्टेंबर रोजी आयोजित केली होती.परदेशासह भारतातून 222 शहरात 1001 परिक्षाकेंद्रावर पार पडली होती, त्यामध्ये एकूण 151311 विद्याथी सहभागी झाले होते.प्रिया गोळे ही मुलगी वरुड येथिल शेतकरी कुटुंबातील असल्या मुळे सर्वत्र कौतुक होत आहे.कु.प्रिया गोळे हिच्या पुढील वाटचालिस निर्भिड स्वराज्य कडून हार्दिक शुभेच्छा…..
previous post