बुलडाणा : बुलडाण्याकडून दुपारी १ वाजेदरम्यान खामगावच्या दिशेने जाणाऱ्या एमएच -२८-एबी-७३१२ क्रमांकाच्या मालवाहतूक ट्रकचा बोथा घाटात ज्ञानगंगा अभयारण्याच्या कमानीजवळ अपघात झाला असून या अपघातात ट्रक चालकासह ४ व्यक्ती जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार शेगाव संस्थानचा मालवाहक ट्रक बुलडाण्याहुन खामगावच्या दिशेने जातांना ड्राइवर चे नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्याच्या कडेला असणाऱ्या झाडावर वेगाने धडकला. या अपघातात चार व्यक्ती गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात एवढा भिषण होता की ट्रकसमोर आलेले झाडाचा अक्षरशः चुराडा झाला व ट्रकच्या केबीनचा चुराडा झाला. जखमींना तातडीने खामगाव शासकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलविण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
previous post