April 19, 2025
आरोग्य जिल्हा बुलडाणा महाराष्ट्र मुंबई शेगांव

शेगाव संस्थानचे विश्वस्त शिवशंकरभाऊ पाटील यांची प्रकृती चिंताजनक; उपचार सुरु

शेगाव : श्री गजानन महाराज संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त कर्मयोगी शिवशंकर भाऊ पाटील यांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. डॉक्टरांनी त त्यांची पासणी केली असता नाडीचे ठोके अद्याप सुरू असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले आहे. गत तीन दिवसांपासून मल्टीऑर्गन फेल्यूअरमुळे शिवशंकरभाऊ पाटील यांची प्रकृती चिंताजनक बनली आहे.

त्यांच्या सांगण्यानुसारच त्यांच्यावर घरीच शेगांव येथील डॉ. हरीश सराफ यांच्या मार्गदर्शनात पूर्ण मेडिकल सेटअपसह उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. त्यांचा रक्तदाब कमी झालेला असून ऑक्सीजनही लावण्यात आलेला आहे. शिवशंकरभाऊंनी आयुष्यभर आयुर्वेदिक उपचारालाच प्राधान्य दिल्यामुळे त्यांच्या प्रकृतीसदर्भात बुलढाणा येथील आयुर्वेदतज्ञ डॉ. गजानन पडघान यांनाही तिथे बोलविण्यात आल्याची माहिती आहे.

Related posts

उत्तर प्रदेश मधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यांवर कारवाई करा- ऑल इंडिया पँथर सेनेची मागणी

nirbhid swarajya

एक अनोखे क्षेत्र – हीलिंग

nirbhid swarajya

जिल्ह्यात आज प्राप्त 361 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 107 पॉझिटिव्ह

nirbhid swarajya
error: Content is protected !!