शेगाव : दिल्ली येथे पार पडलेल्या खासदारांच्या शपथ विधी सोहळ्यात भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी शपथ घेतली नंतर जय भवानी जय शिवाजी असा उल्लेख केला त्यानंतर देशाचे उपराष्ट्रपती व सदनाचे सभापती यांनी हे तुमचे घर नाही माझेच चेंबर आहे यानंतर कोणत्याही घोषणा सभागृहात द्यायचे नाही असा उल्लेख केला मात्र यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाल्याने त्यांच्या व्यक्तव्याचा शेगाव शहर शिवसेना व युवासेना कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांकडून निषेध व्यक्त करण्यात आला व शेगाव तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख यांनी आपली भूमिका मांडली.
previous post