शेगांव:-शासकीय पदाचा व शासकीय वाहनाचा गैरवापर करून शेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांवर ,ग्रामस्थांवर खोट्या केसेस दाखल करून ञास देणाऱ्या शेगाव येथील तहसील कार्यालयातील शासकीय गाडीवर असलेल्या वादग्रस्त वाहन चालक संतोष सातभाकरे यांची चौकशी करून त्याच्या वर कठोर कारवाई करण्यात यावी. अशी तक्रार कालवड येथील श्रीराम काळे यांनी जलंब पो.रटे ठानेदार यांच्या कडे एका निवेदनाद्वारे केली आहे.त्यांनी दिलेल्या निवेदनामध्ये नमुद केले आहे की शेगाव तहसील कार्यालयातील शासकीय गाडीवर असलेला वाहन चालक संतोष सातभाकरे याने दि.१४ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता च्या सुमारास कठोरा शिवारामध्ये घडलेल्या घटने मध्ये शासकीय पदाचा गैरवापर करून व शासनाच्या वाहनाचा दुरुपयोग करून रवःताच शासनाचे वाहनावर दगड मारून गाडीचा काच फोडला तसेच रवःताच्या हाताने अंगावरील कपडे फाडून परिसरातील काही निष्पाप नागरिका विरुद्ध खोट्या गुन्हा मध्ये गोवन्याच्या उद्देशाने खोटी तक्रार जलंब पो.रटे मध्ये देऊन त्यांच्या विरुद्ध कलम ३५३ नुसार विविध गुन्हा मध्ये अडकून कारागृहात पाठवले आहेत. तर संपूर्ण प्रकार हा भयावह असल्यामुळे परिसरातील नागरिका मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर घडलेल्या घटनेची वस्तु स्थिती हि खरी नसून सत्य परिस्थिती हि काय आहे ती मोबाईल वर व्हायरल झालेल्या चिञफित पाहिल्या नंतर दिसून येते. तर घडलेला प्रकार वाहन चालक संतोष सातभाकरे यांनी खोडसळ पने जाणुन बुजून घडवुन आनला आहे त्यामुळे त्या वादग्रस्त वाहन चालकाविरुद्ध चौकशी करून कठोर कारवाई करून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा व त्याला शासकीय पदावरून तात्काळ निलंबित करण्यात यावे अशी मागणी हि केली आहे.तसेच वादग्रस्त वाहन चालक सातभाकरे याने शेगाव तालुक्यातील शेतकरी व ग्रामस्थावर पदाचा गैरवापर करून एक प्रकारे दहशत निर्माण करण्यासाठी निष्पाप लोकांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडविण्याच्या धमक्या देऊन आर्थिक उद्देश सफलकरण्यासाठी नेहमी शासकीय पदाचा व वाहनाचा गैरफायदा घेऊन बेकायदेशीर पणे संपूर्ण तालुक्यामध्ये फिरून कारवाई करण्याची धमकी देण्याचा प्रकार मागील काही वर्षांपासून सतत सुरु आहे परंतु तरीही तहसील प्रशासनाने, शासनाने त्या वादग्रस्त वाहन चालकावर कोणतीही कारवाई केली नसल्यामुळे त्यांची हेमंत वाढली आहे. तसेच वादग्रस्त वाहन चालक याने शेगाव पो.स्टे मध्ये सुध्दा नागरिकां विरुद्ध फिर्याद दाखल करून खोटे गुन्हे दाखल केले आहे. अशा आरोपही हि तक्रारीमध्ये नमूद केला आहे.तसेच सदर निवेदनाच्या प्रतिलिपी जिल्हा पोलीस अधीक्षक बुलडाणा, व उपविभागीय पोलीस अधिकारी खामगाव यांना पाठविण्यात आल्या आहेत.
