October 6, 2025
जिल्हा बुलडाणा महाराष्ट्र राजकीय शेगांव

शेगाव येथे धनगर आरक्षणासाठी निदर्शने; सरकारचा निषेध

शेगांव : घटनेनुसार धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण असतानाही गेल्या 66 वर्षांपासून आरक्षणाची अंमलबजावणी होत नसल्याने काल 25 सप्टेंबर रोजी सकल धनगर समाज बांधवांनी राज्य सरकारच्या काळ्या फीती लावून निषेध केला व तहसील कार्यालयामार्फत मुख्यमंत्री यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. धनगर समाज मेंढपाळ असून राना-वनात भटकणारा समाज आहे, राज्यात मेंढपाळांवर दिवसेंदिवस हल्ले होत असताना राज्य सरकार मात्र कुठलीही भूमिका घेण्यास तयार नाही. त्यामुळे तात्काळ मेंढपाळांना संरक्षण देऊन त्यांच्यावर हल्ला करणाऱ्यांसाठी कठोर कायदा करण्यात यावा तसेच भाजप सरकारने धनगर समाजासाठी एक हजार कोटीचे बजेट जाहीर केले होते, त्याची अंमलबजावणी महाविकास आघाडी सरकारने करावी.

यासह इतरही मागण्या तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात नमूद आहेत.गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेस राष्ट्रवादी त्यानंतर भाजप-सेनेच्या सत्ताधारी पक्षांनी आरक्षणाच्या नावावर समाजाची मते मिळवली मात्र आरक्षण दिले नाही,तर आता सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडी सरकारने देखील धनगर आरक्षणासाठी कुठलेही पाऊल उचलले नाही.त्यामुळे सरकारने आपली खुर्ची खाली करावी अशी मागणीसुद्धा धनगर समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी गोपाल मोहे,अमर बोरसे,चंद्रकांत माने, सागर घुले,शिवम कळंबे,श्रावण कुंडे,निलेश घोंगे,गणेश वसतकार,प्रवीण विरघट, गोपाल उज्जैनकार,संतोष वानखेडे,देवचंद समदुर, पुंडलिक गोळे, सचिन जाधव,यांच्यासह धनगर समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Related posts

108 रुगवाहिकेच्या चालकांचा मनमानी कारभार

nirbhid swarajya

जिल्ह्यात आज प्राप्त 420 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 145 पॉझिटिव्ह

nirbhid swarajya

गो.से.महाविद्यालयाचे रासेयो शिबिर संपन्न…

nirbhid swarajya
error: Content is protected !!