January 7, 2025
शेगांव

शेगाव येथे जुगारावर छापा

पोलिसांनी सात जणांना घेतले ताब्यात

शेगांव : शेगाव येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यात्रा निवासी मधील एका रूम मध्ये जुगार खेळत असल्याची गुप्त माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी यांना मिळाली होती. त्या गुप्त माहितीच्या आधारे त्यांनी तेथे छापा टाकला असता सुनिल कन्हैयालाल काशेलानी ५० , शिवकुमार बैजनाथसिंग सिंघेल ४३, सोनु सुखदेव अरदळे ३१ , गणेश तुकाराम सोलनकर ४२,राजु जगदेव पारोडे ५० सचिन नामदेव बर्वे ३९, गजानन सदाशिव नाईकवाडे ३० हे २५ जून रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास तेथील बंद खोलीत जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन करुन एक्का बादशहा जुगार खेळताना मिळून आले. त्यांचे कडून नगदी ३२ हजार २७० रुपये,७ मोबाईल ४२ हजार रु ५२ ताशपत्त्या सह ३ मोटार सायकल ३ नग एकुण किमती १ लाख १० हजार रु असा एकुण १ लाख ८४ हजार ४९० चा मुद्देमाल माल जप्त केला असुन या प्रकरणी शेगांव शहर पोलिस स्टेशन ला स.पो.नि.रविंद्र मोतीराम लांडे यांच्या फिर्यादि वरुन ७ जणाविरुद्ध कलम ४.५, महाराष्ट्र जुगार कायदा सह कलम २६९.२७०,१८८ भादवी सह कलम ५१ (ब) राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ सह कलम ३ साथ रोग प्रतिबंधक कायदा,सह कलम कोवीड १९ उपाययोजना नियम २०२० नियम ११ नुसार गुन्हा करण्यात आला सदर करवाई उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटिल यांच्या पथकातील पो.ना.प्रदीप मोठे,पो.ना.देवेंद्र शेळके,पो.ना.संदीप टाफसाळ,पो.ना.अमित चंदेल,पोकॉ रविंद्र कन्नर, आर सी बी पथक पोकों लक्ष्मन इनामे,पोकॉ संघशिल निकाळजे, तसेच पो.स्टे शेगाव शहर येथील पो.उप.नि. दंदे ,पोहेकॉ रमेश काळे,पो. ना. बोरसे, यांनी केली आहे.

Related posts

जलंब येथे राष्ट्रीय पोषण अभियान अंतर्गत सही पोषण देश रोशन या कार्यक्रमाचे आयोजन…

nirbhid swarajya

एन . व्ही . चिन्मय विद्यालयाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश.      

nirbhid swarajya

मुसळधार पावसामुळे सावरगाव तेली गावचा संपर्क तुटला

nirbhid swarajya
error: Content is protected !!