December 29, 2024
गुन्हेगारी जिल्हा बुलडाणा शेगांव

शेगाव येथे अवैधरित्या रेती वाहतूक करणाऱ्यांची दादागिरी

शेगाव: २६ नोव्हेबर रोजी रात्री ९:३० वाजता च्या दरम्यान येथील शिवाजी चौकात उपविभागीय अधिकारी (महसुल) यांच्या पथकाने अवैधरीत्या रेतीची वाहतूक करत असताना टिप्पर पकडल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार २६ नोव्हेबर रात्री ९:३० च्या दरम्यान उपविभागीय अधिकारी (महसुल) खामगाव यांचे पथक पेट्रोलिंग करत असताना त्यांना शिवाजी चौकात अवैधरित्या रेतीची वाहतूक करताना टिप्पर क्र. MH-२८-B-८२०४ दिसून आले.पथकाने गाडी चालकाला थांबायला सांगितले असता त्याने भरगाव वेगाने टिप्पर पळवून नेले.लगेच या पथकाने त्याचा पाठलाग करून त्याला स्थानिक अग्रेसन चौकात त्याला पकडले. या वेळी पथकाने त्याच्या वाहनांची तपासणी केली असता त्यामध्ये त्यांना २ ब्रास रेती आढळून आली.यावेळी पथकाने कागदपत्राची मागणी केली असता त्यांनी उडवाउडवीचे उत्तर देत वादविवाद करण्यास सुरूवात केली व तात्काळ फोन लावून सर्व रेती वाहतूक करणाऱ्यांना बोलावून घेतले असल्याचीही माहिती मिळाली आहे. या सर्व प्रकाराची माहिती रेती माफियांनी स्थानिक शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्यांनी दिली असता त्याने घटनास्थळी येऊन सदर पथकाला त्याने धमक्या सुद्धा दिल्या तसेच गाडी सोडा अन्यथा याचे परिणाम वाईट होतील अशी सुद्धा धमकी शिवसेनेच्या पदाधिकार्‍याने दिली.असल्याचे प्रत्यक्षदर्शि लोकांनी सांगितले.अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांचा जमाव झाला असता आपल्या सुरक्षेच्या दृष्टीने या तहसील पथकाने तात्काळ शेगाव शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार संतोष ताले यांच्याशी संपर्क साधून पोलीस यंत्रणा बोलवली. यावेळी जमलेल्या सर्व रेती माफिया ऐकण्याच्या परिस्थितीत नव्हते त्यामुळे पोलीस प्रशासनाला जमावाला पांगवण्यासाठी सौम्य प्रमाणात लाठीचार्ज करावा लागला. त्यानंतर तहसील पथकाने मंडळ अधिकारी दीक्षित यांच्या ताब्यात सदर वाहन देऊन ते वाहन पोलीस स्टेशन येथे लावण्यात आले आहे.व उपविभागीय अधिकारी तहसील यांच्या कडे पुढील कार्यवाही साठी वर्ग केले आहे. या विषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पोलीस विभागाशी संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.या सर्व प्रकारांमध्ये ईनोवा घेऊन येणाऱ्या त्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना रेती माफियांशी काय संबंध ? त्याच्या वर गुन्हा दाखल करणार का ? याची चर्चा २-३ दिवसांपासून शेगांव शहरातील नागरिकांमधे जोरदार सुरु आहे.आता तरी प्रशासनाने तात्काळ याकडे लक्ष देऊन कठोर कार्यवाही करावी अशी मागणी शेगांवकर करत आहेत.या प्रकरणाचा उपविभागीय अधिकारी क़ाय निर्णय घेता या कडे सर्व शेगांवकरांचे लक्ष लागले आहे.

Related posts

जुगारावर पोलिसांचा छापा; १० जणाविरुद्ध गुन्हा दाखल

nirbhid swarajya

कोरोनामुळे ‘हायजेनिक’ रक्तदान शिबिर

nirbhid swarajya

जिल्ह्यात आज प्राप्त 335 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 72 पॉझिटिव्ह

nirbhid swarajya
error: Content is protected !!