शेगाव :- बस स्थानकातून प्रवाशांना घेऊन संग्रामपूरकडे निघालेल्या एसटी बसला समोरून येणाऱ्या भरधाव कार ने धडक मारल्याची घटना आज 26 जुलै रोजी सकाळी नऊच्या दरम्यान शेगाव कालखेड रोडवर घडली या घटनेत कारमधील दोघेजण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे याबाबत सविस्तर असे की जळगाव जामोद आगाराची बस क्रमांक एम एच 06/एस.8806 ही बस शेगाव बस स्थानकावरून 15 प्रवाशांना घेऊन संग्रामपूरकडे सकाळी नऊच्या दरम्यान निघाली शेगाव येथून कालखेड रोडने जाणाऱ्या या बसला पेट्रोल पंपाजवळ एका कारणे समोरच्या बाजूने धडक दिली या अपघातात बसचे समोरचे टायर पंचर होऊन जागीच बसले व बसच्चा समोरच्या भागाचे बरेच नुकसान झाले तसेच कारच्या समोरच्या भागाचे मोठे नुकसान झाले आहे या घटनेत कार चालक अभय लव्हाळे वय 40 राहणार सुनाव आहे त्यांच्या आईला शेगाव येथे खाजगी रुग्णालयात तपासणीसाठी भरती करण्यात आले सोनाळा येथून शेगावकडे येताना त्यांची कार एसटी बसला धडकली या दुर्घटनेमध्ये कारमधील अभय लव्हाळे हे गंभीर जखमी झाले तर त्यांची आई शांताबाई लव्हाळे वय 75 वर्षे या जखमी झाल्या या घटनेत बसचे नुकसान झाले आहे सदर दुर्घटनेनंतर बसमधील सर्व प्रवाशांना दुसऱ्या बसमधून पुढच्या प्रवासाला पाठविण्यात आले बस चालकाने कारचालक राहणार सोनाळा विरुद्ध शेगाव शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली असून कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे