सोमवारी कवी संमेलन व ‘शेगाव भूषण’ पुरस्कार वितरण सोहळा
सोमवारी कवी संमेलन व ‘शेगाव भूषण’ पुरस्कार वितरण सोहळा
शेगाव : पत्रकार दिनाचे औचित्य साधून शेगाव पत्रकार संघाच्या वतीने कवी संमेलन व पत्रकार दिन सोहळ्याचे आयोजन ९ जानेवारीला संध्याकाळी ६ वाजता, गांधी चौक शेगाव येथे करण्यात आले असून या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बद्दल दै. देशोन्नतीचे आवृत्ती संपादक राजेशजी राजोरे यांना ‘शेगाव भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटक माजीमंत्री आ.डॉ.संजयजी कुटे तर कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार राजेशजी राजोरे व प्रमुख उपस्थिती खा. प्रतापराव जाधव, आ.आकाशजी फुंडकर यांची राहणार आहे. पत्रकार दिन सोहळ्यात ‘मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा फेम सुप्रसिद्ध कवी अनंत राऊत’ यांच्यासह हास्यसम्राट वऱ्हाडी कवी नितीन वरणकार, ज्येष्ठ वऱ्हाडी कवी प्रा.संजय कावरे, गझलकार, सूत्रसंचालक गोपाल मापारी या कवीच्या उपस्थितीत निखळ हास्य मनोरंजनातून कवी संमेलनाचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी रामविजय बुरुंगले, ज्ञानेश्वरदादा पाटिल, दयारामभाऊ वानखडे, सौ.स्वातीताई वाकेकर, तेजेंद्रसिंग चव्हाण, शरदसेठ अग्रवाल, गणेश चौकसे, भास्करराव पाटिल, प्रसेनजीत पाटिल, सौ.नंदाताई पाऊलझगडे, सौ.शकुंतलाताई बुच, सौ.कल्पनाताई मसने, शांताराम दाणे, राजू मिरगे, अविनाश दळवी, सौ.प्रितिताई शेगोकार, नितीन शेगोकार, विजय भालतडक, शे. महेबुब ठेकेदार, संजय गव्हांदे, ज्ञानेश्वरआप्पा साखरे, किरणबाप्पू देशमुख, दिनेश साळुंके, प्रवीण बोदडे, योगेश पल्हाडे, अमित देशमुख, शे.मुख्तार ठेकेदार, विजय यादव, सौ.मंगलाताई घोपे, सलीम उमर शेख यांच्यासह मराठी पत्रकार परिषदेचे राजेंद्र काळे,चंद्रकांत बर्दे, सतिषाअप्पा दुडे, नितीन शिरसाट, व्हाईस ऑफ मीडियाचे अनिल म्हस्के,लक्ष्मीकांत बगाडे, अरुण जैन,सिद्धेश्वर पवार, शेगाव तहसीलदार समाधान सोनवणे, बीडीओ सतीष देशमुख, ठाणेदार अनिल गोपाळ, राहुल जंजाळ, धिरज बांडे, मुख्याधिकारी जयश्री बोराडे यांची उपस्थिती राहणार असून नागरिकांनी मोठ्या उपस्थित राहण्याचे आवाहन शेगाव पत्रकार संघाच्या वतीने अमर बोरसे, नानाराव पाटिल, संजय सोनोने, नंदू कुळकर्णी, दिनेश महाजन, संजय त्रिवेदी यांनी केले.