शेगाव – सन २०२२ – २३ या वर्षात पंचायत समितीच्या सेस फंडातून विविध शासकीय योजने अंतर्गत विविध घटकांसाठी योजना राबविण्यात येत असून या योजनेचा ( अनुदानाचा ) लाभ शेगाव तालुक्यातील पात्र लाभार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन शेगाव पंचायत समितीचे बिडीओ सतिषबाप्पू देशमुख यांनी केले आहे.
मागासवर्गीय लाभार्थ्यांना ९० % अनुदानावर इयत्ता ९ वी ते १२ मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे पालकांना सोलर लाईट देण्याची योजना असून ८ ऑगस्ट पर्यंत ग्रामपंचायत मध्ये अर्ज करावा, तसेच दिव्यांग लाभार्थ्यांना शंभर टक्के अनुदानावर कमोड चेअरचा लाभ देण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील किमान दहावी उत्तीर्ण व १६ ते ४० वयोगटातील महिलांना ९० टक्के अनुदानावर एमएससीआयटी प्रशिक्षण योजना देण्यात येत असून लाभ घेण्यासाठी इच्छुकानी अटी शर्थीची पूर्तता करून ग्रामपंचायत कार्यालयात सचिव यांच्याकडे २२ जुलै पर्यंत अर्ज सादर करावे, अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकरी यांचे करता डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकरी यांचे करता बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना राबविण्यात येत असून त्या अंतर्गत नवीन सिंचन विहिरी करिता श्रीक्षेत्र नागझरी, शेलगाव, तींतरव, वरखेड बु, टाकळी, नागझरी, मनारखेड, मजलापुर, उन्हाळखेड, जलंब, कुरखेड, महागाव, तरोडा कसबा या शिवारात अडीच लाख अनुदानाचा लाभ देणे आहे. तालुक्यातील सर्व शिवारात जुनी विहीर दुरुस्ती करता अनुदान ५० हजार व इनवेल बोरिंग करिता अनुदान २० हजार, वीज जोडणी आकार करिता अनुदान १० हजार, पंपसंच करिता अनुदान २० हजार, शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण करता अनुदान १ लाख, ठिबक सिंचन संच करिता अनुदान ५० हजार, तुषार सिंचन करिता अनुदान २५ हजार तसेच फक्त अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकरी यांचे करिता बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अंतर्गत परसबाग अनुदान रुपये पाचशे डिझेल पंप संच करिता अनुदान रुपये २० हजार, तसेच पीव्हीसी / एचडीपीई पाईप करिता अनुदान ३० हजार असून गरजू व पात्र लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी महा-डीबीटी पोर्टलचे http://mahabdtmahait.gov. in या संकेत स्थळावर ऑनलाईन अर्ज करावा असे आवाहन बिडीओ सतिष देशमुख व सहा. बिडीओ बाबूसिंग चव्हाण यांनी केले आहे.(श.प्र.)