रेती माफियांना महसूल प्रशासनाचे अभय…शेतच कुंपण खात असल्याचा हा धंक्कादायक प्रकार…
शेगाव(प्रतिनिधी विनायक देशमुख)तालुक्यातील डोलारखेड व पूर्णा नदीकाठच्या परिसरातून मोठ्या प्रमाणात रेतीची अवैधपणे वाहतूक होत असून,रेती माफीयावर लगाम घालण्यात शेगावचे महसूल प्रशासन सपशेल अपयशी ठरले आहेत.प्रशासनाच्याच आशीर्वादाने रेतीची चोरी होत असून,रेती माफियांचे भाव वाढले आहेत.याचा त्रास मात्र सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे.रेती माफियांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून रेती माफिया शिरजोर झाले आहेत.त्यांच्या दहशतीमुळे नदीकाठी राहणाऱ्या नागरिकामध्ये भीतीची वातावरण निर्माण झाले आहे.आजरोजी त्यांच्यवर कुणाचाच वचक राहिलेला नाही.शेगाव तहसील प्रशासनाच्या आशीर्वादाने रेती माफिया गबर झाले असून त्यांनी मोठी माया जमवली आहे.प्रति ब्रास सात ते दहा हजार रुपये दराने रेती विकून ते रेती विकत असून प्रशासनाला चुना लावत आहेत.तालुक्यातील ज्ञानगंगा व पूर्णा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात रेतीचे अवैशपने उत्खनन करून दररोज ट्रक्टर व टिप्परदारे खुलेआम रेतीचा उपसा सुरू आहे. काही रेती माफियांनी तर हजारो ब्रास रेतीची साठवणूक करून ठेवली आहे. साठविलेल्या रेतीचे मोठमोठे ढीग आजू बाजुच्या शेतशिवारात मोठ्या प्रमाणात पहायला मिळतात… रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत रात्रीच्या वेळेला ट्रक्टर,टीप्परने खामगाव व शेगाव येथे रेतीची अवैधपणे वाहतूक केली जाते.शेत शिवरात रेतीची मोठ्या प्रमाणात साठवणूक केल्याने मोठ्या प्रमाणात खराब झाले असून त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.
ऐवढ्या मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी होत असून याची पुरेपूर माहिती संबंधित तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलद यांना आहे.बऱ्याच वेळी एकदोन आठवड्यात महसूल प्रशासना कडून रेतीवाहनांवर कारवाई केल्याच्या बातम्या ही ऐकायला मिळतात.पण अशा तात्पुरत्या स्वरूपाची कायरवाई न करता ठोस कारवाई करून नदीपात्रातील रेती उपसा बंद करून रेती माफियांच्या कायमस्वरूपी मुसक्या आवळल्या पाहिजे. झोपेचं सोग घेतलेल्या प्रशासनाला जाग येने शक्य नाही. कारण रेतीमाफायांकडून त्यांना छुप्या मार्गाने पैसे दिल्या जात असल्याचे नागरिकांमध्ये बोलल्या जात आहे.यामुळे सर्व सामान्य माणसाचा तहसील कार्यालयावरील विश्वास उडालेला आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन शेकडो ब्रास साठवलेल्या रेतीचा पंचनामा करून रेती माफियावर कारवाई करावी,अशी मागणी नागरीकांकडून केल्या जात आहे .