October 6, 2025
अमरावती खामगाव जिल्हा नागपुर पुणे बातम्या बुलडाणा ब्लॉग महाराष्ट्र मुंबई विदर्भ विविध लेख शेगांव शेतकरी संग्रामपूर सामाजिक

शेगाव तालुका पत्रकार संघाची नूतन कार्यकारणी गठीत…

अध्यक्ष फहीम देशमुख तर सचिवपदी नंदू कुळकर्णी शेगाव

शेगाव : शेगाव तालुका पत्रकार संघाची नूतन कार्यकारणी नुकतीच गठीत करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी फहीम देशमुख तर सचिवपदी नंदू कुळकर्णी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.स्थानिक विश्राम गृह येथे पार पडलेल्या कोअर कमिटी बैठकीत ही निवड जाहीर करण्यात आली. यावेळी मावळते अध्यक्ष धनराज ससाणे आणि सचिव दिनेश महाजन यांनी दोघांच्या नियुक्तीला अनुमोदन दिले. त्यानंतर अध्यक्ष फहीम देशमुख व सचिव नंदू कुळकर्णी यांनी उपस्थित सर्वानुमते शेगाव तालुका पत्रकार संघाची उर्वरित कार्यकरणी गठीत केली.यात कार्याध्यक्षपदी संजय सोनोने, उपाध्यक्षपदी अनिल उंबरकर, राजेश चौधरी, सहसचिव सतीश अग्रवाल, कोषाध्यक्ष धनराज ससाणे, संघटक दिनेश महाजन तर कार्यकरणी सदस्य म्हणून अविनाश दळवी, नानाराव पाटील,संजय ठाकूर, संतोष पिंगळे, प्रकाश उन्हाळे,राजकुमार व्यास, अमर बोरसे,राजवर्धन शेगावकर,संजय त्रिवेदी,नारायण दाभाडे,नितीन घरडे,मंगेश ढोले, ज्ञानेश्र्वर ताकोते,सचिन कडूकार आदींचा समावेश आहे.

Related posts

जिल्ह्यात आज प्राप्त 212 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 38 पॉझिटिव्ह

nirbhid swarajya

‘तेंव्हाही’ रेल्वे बंद नव्हती..रेल्वेची भारतीयांना कळकळीची विनंती

nirbhid swarajya

मराठा पाटील युवक समिती च्या वतीने शाखा भोटा ता. नांदुरा येथें मोफत नेत्र तपासणी शिबीर संपन्न

nirbhid swarajya
error: Content is protected !!