January 1, 2025
खामगाव गुन्हेगारी जिल्हा नांदुरा महाराष्ट्र मुंबई राजकीय शेगांव

शेगाव तहसीलची अवैध वाळू वाहतूक करणार्‍यांवर धडक कारवाई

अवैध वाळूचे ६ ट्रक जप्त ७ लाख ५४ हजार रुपयांचा दंड ठोठावला

बुलढाणा : शेगाव तहसीलदार समाधान सोनवणे यांनी धडक कारवाई करून अवैधरित्या वाळूची चोरटी वाहतूक करणारे ६ वाहन जप्त करून त्यांच्यावर एकूण ७ लाख ५४ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. याबाबत शेगाव तहसील कार्यालयातून देण्यात आलेल्या माहितीनुसार शिवनेरी चौक शेगाव येथे एक वाहन तहसील पथकाला येताना दिसल्यावरून सदर वाहन ग्रे रंगाचे विना नंबरचे होते. या वाहनाला थांबवून वाहन चालक देवानंद विलास बोरकर राहणार कुंभारखेड -कवठळ (पातुर्डा) तालुका संग्रामपुर याला वाहनाच्या कागदपत्र बाबत विचारणा केली असता त्याच्याकडे कोणताही परवाना नसल्याचे चालकाने सांगितले. या वाहनांची तपासणी केली असता वाहनामध्ये काठोकाठ वाळू भरलेली असल्याने व वाळू वाहतुकीबाबत कोणताही परवाना नसल्याने सदर वाहन मालकाचे नाव शुभम नरेश बावणे असल्याचे चालकाकडून सांगण्यात आले. उपरोक्त वाहनातून दोन ब्रास रेती विनापरवाना वाहतूक केल्यामुळे वाहन मालकाविरुद्ध कलम 48 (7) अन्वये दंड आकारणी रुपये ३० हजार रॉयल्टी रुपये ८०० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार आणि दिनांक १२ जानेवारी २०१८ मधील ८,९ आणि ९,२ मधील तरतुदीनुसार रुपये एक लाख रुपये असे १ लाख ३० हजार आठशे रुपये गाडी मालकाला दंड ठोठावण्यात आला आहे. वरवट शेगाव रोडवर कालखेड गावाजवळ एम एच २८ बीबी १३६७ यामधून दोन ब्रास रेतीची अवैध वाहतूक करताना मिळून आली सदर वाहन सचिन तेजराव कडाळे यांचे मालकीची असल्याचे चालकाने सांगितले. वाहन मालकाविरुद्ध २ लाख ३० हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. रात्रगस्त पेट्रोलिंग करीत असताना बस स्थानक परिसरात वाहन क्रमांक एम एच २८ बी ७०८४ चालक अनिल फाळके हा त्याच्या ताब्यातील वाहनातून २ ब्रास रेती विनापरवाना वाहतूक करताना मिळून आला. वाहन मालकाचे नाव धनंजय लांडे असल्याचे चालकाने सांगितले याबाबत तहसीलदार शेगाव यांनी १ लाख ३० हजार रुपये दंड आकारला. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक शेगाव येथे वाहन क्रमांक एम एच २८ एबी २४६३ च्या वाहनचालक कैलास दत्तात्रय अढाव राहणार पेसोडा तालुका संग्रामपुर असल्याची माहिती किसन शामराव आढाव या वाहनातून एक ब्रास रेती विनापरवाना वाहतूक करीत असताना आढळून आला. एस टी धमाळ मंडळ अधिकारी यांच्या अहवालानुसार शेगाव तहसीलदारांनी वाहन मालकाविरुद्ध १ लाख १५ हजार ४०० रुपये दंड ठोठावला. याचप्रमाणे तरोडा येथे वाहन चालक संतोष जानकीराम वघारे राहणार खातखेड हा वाहन क्रमांक एम एच २८ बीबी १५५७  एक ब्रास रेती विनापरवाना वाहतूक करीत असताना आढळून आला. वाहन मालक विष्णुप्रसाद वाघ राहणार खातखेड विरुद्ध १ लाख १५ हजार ४०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. खातखेड येथे वाहन क्रमांक एम एच २८ बीबी ७९३५ मधून २ ब्रास रेती विनापरवाना वाहतूक करताना सदर वाहन मिळून आल्याने वाहन मालकाविरुद्ध १ लाख ३० हजार ८०० रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. अशाप्रकारे शेगांवचे तहसीलदार समाधान सोनवणे यांनी रेती माफिया विरुद्ध धडक कारवाई करून वाळूची चोरटी वाहतूक करणारे ६ वाहनं जप्त करून मालकाविरुद्ध एकूण ७ लाख ५४ हजार रुपयांचा दंड ठोठावला तहसीलदार शेगाव यांच्या या धडक कारवाईमुळे वाळूमाफिया मध्ये प्रचंड खळबळ निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. भोनगाव नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध रेती उपसा होत आहे तसेच रेती माफिया या सर्व घटनेची व्हिडिओ काढून सोशल मीडियावर स्टेटस ठेवत वायरल करत आहेत. सोबतच शेगाव रोड वरून मोठ्या प्रमाणावर अवैध रेती वाहतूक सुरू आहेत, याकडे सुद्धा पोलिस प्रशासन व महसूल प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.अपर पोलीस अधीक्षक श्रवण दत्त खामगाव रुजू होताच जलंब हद्दीत अवैध रेती वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. मात्र नांदुरा व शेगाव कडे दुर्लक्ष का होत आहे ? ऐसा प्रश्न सुद्धा सामान्य नागरिकांना पडला आहे.

Related posts

लक्कडगंज भागातील पिण्याच्या पाण्याची समस्या मार्गी लावा….

nirbhid swarajya

बुलडाणा जिल्ह्यातील संत्रा व केळी उत्पादक शेतकऱ्यांना अपेडा व ऍग्रोविजन मधून मार्गदर्शन द्या – श्याम आकोटकार यांची नितीन गडकरी यांच्या कडे मागणी

nirbhid swarajya

रविकांत तुपकरांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी! बुलढाणा न्यायालयाचा निर्णय….

nirbhid swarajya
error: Content is protected !!