उत्तम सेवाभिलेख ठेवल्या बद्दल सन्मान
शेगाव : महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यातील अनेक पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना मानाचे पोलिस महासंचालक पदक जाहीर करण्यात आले असून यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव ग्रामीण पो.स्टे.ला ठाणेदार म्हणून कार्यरत असलेले ठाणेदार गोकुळ सूर्यवंशी यांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल मानाचे पोलिस महासंचालक पदके जाहीर केली आहेत. पोलीस सेवेत उत्तम सेवाभिलेख ठेवल्याबद्दल त्यांना हे पदक बहाल करण्यात येणार आहे. पोलीस विभागात काम करीत असताना अधिकारी व कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते. अशा वेळेस चोखपणे कर्तव्य बजावत असताना नागरिकांशीही चांगले संबंध ठेवून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नेहमीच प्रयत्नरत राहणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना दरवर्षी पोलीस विभागाकडून विविध पदचिन्हे देऊन सन्मानित करण्यात येते. यामध्ये उद्या १ मे या महाराष्ट्र दिनानिमित्ताने पोलीस महासंचालक यांचे पदचिन्हासाठी राज्यातील कर्मचारी व पोलिसांची अधिकाऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली असून यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार गोकुळ सूर्यवंशी यांचा समावेश करण्यात आलेला आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असताना मागील १५ वर्षाच्या पोलीस दलातील सेवा काळामध्ये नांदेड, नागपूर व सध्या शेगाव येथे ठाणेदार म्हणून कार्यरत असलेले गोकुळ सूर्यवंशी यांना आतापर्यंत पोलीस दलातील १५० च्या जवळपास विविध बक्षिसे प्राप्त झालेली आहेत, याशिवाय दरवर्षी राज्यभरातून पोलिस दलात उत्तम सेवा देणाऱ्या मध्ये त्यांचा समावेश करून त्यांना सन्मानित करण्यात येते. सूर्यवंशी यांना पोलीस सेवेत उत्तम सेवाभिलेख ठेवल्या बद्दल महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक यांचे पदक जाहीर झाले आहे.