छत्तीसगड चे मुख्यमंत्री बघेल आणि हार्दिक पटेल यांची उपस्थिती
शेगांव:-ओबीसींचे राजकीय आरक्षण आणि आपल्या इतर मागण्यांच्या संदर्भात बुलढाणा जिल्ह्यातील संत नागरी शेगाव येथे ओबीसी समाजाचा एक सामाजिक महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. येत्या २८ मार्च रोजी हा महामेळावा होणार असून त्या मेळाव्यात छत्तीसगड चे मुख्यमंत्री बघेल आणि काँग्रेस नेते हार्दिक पटेल, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यासाठी राज्यातील ओबीसीचे नेत्यांना ही निमंत्रण देण्यात येणार आहे. यासाठी शेगावात जय्य्त तयारी सुरु काण्यात आली असून स्टेज आणि मंडप उभारणीसाठी खास गोवा येथून कंत्राटदाराला पाचारण करण्यात आले आहे..केंद्र सरकारने ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेला स्पष्ट नकार दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसीचे राजकीय आरक्षण स्थगित केले आहे, यामुळे ओबीसींचे राजकीय प्रतिनिधीत्व संपुष्टात आले. तसेच वैद्यकीय प्रवेशाचा कोटाही स्थगित करण्यात आला. ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थामधील आरक्षण रद्द झाल्यामुळे राज्यातील सर्वच जिल्हा परिषद, नगरपालिका, मनपा यातील 56 हजार लोकप्रतिनिधींना याचा फटका बसला. यावर विचारमंथन करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातील ओबीसी शाखेकडून राज्यात ठिकठिकाणी ओबीसींसाठी सामाजिक महामेळावे आयोजित करण्यात नयेत आहे. याअंतर्गत येत्या २८ मार्च रोजी बुलढाणा जिल्ह्यातील संत नागरी शेगावात अकोला वाशीम आणि बुलढाणा जिल्ह्यकातील ओबीसींकरिता सामाजिक महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये आज शहरातील स्वर्गीय गजाननदादा पाटील मार्केट यार्डाच्या मैदानाची पाहणी व सभामंडपाचे नियोजन करण्यात आले. या महामेळाव्याच्या यशस्वीतेसाठी खास गोव्यातून एका इव्हेन्ट मॅनेजर ला पाचारण करण्यात आले असून आज खामगाव विधानसभा मतदारसंघाचे नेते ज्ञानेश्वरदादा पाटील, काँग्रेस पक्षाचे प्रदेश चिटणीस धंनजयदादा देशमुख यांच्या देखरेखी खाली नियोजन करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष किरणबाप्पू देशमुख, डॉ. जयंतराव खेळकर, कैलासबाप्पू देशमुख आदींची यावेळी उपस्थिती होती. या मेळाव्यात तिन्ही जिल्ह्यातील ५ हजारच्या जवळपास ओबीसी बांधव उपथित राहणार असल्याचे धंनजयदादा देशमुख प्रदेश चिटणीस- अ.भा. प्रदेश काँग्रेस यांनी निर्भिड स्वराज्य सोबत बोलतांना दिली आहे