अखिल भारतीय किसान सभेच्या पदाधिकाऱ्यांना घेतले ताब्यात
शेगाव : अखिल भारतीय किसान सभा बुलडाणा जिल्हा कमिटी च्या वतीने मोदी सरकारने लागू केलेले शेतकरी विरोधी कायदे रद्द करा, शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव द्या,वाढती महागाई कमी करा, शेतकरी आंदोलनात झालेली दडपशाही आणि गुन्हे मागे घ्या, यासह अन्य मागण्यांसाठी शेगावात रेल रोको आंदोलनाचा प्रयत्न करणाऱ्या पदाधिकारी व कार्यकर्त्यां आंदोलकांना आज शेगांव शहर पोलिसांनी रेल्वेस्थानकासमोरच ताब्यात घेतले. आज सकाळी ५ वा. पासूनच शेगाव शहर व रेल्वे पोलिस व रेल्वे सुरक्षा बलाने रेल्वेस्थानकावर कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता.पोलीस या आंदोलकाचे शोधात होते.दरम्यान दुपारी १२ वा. दरम्यान अखिल भारतीय किसान सभा बुलडाणा जिल्हा कमिटीचे काही प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरण तसेच वाढत्या महागाई विरोधात आणि खाजगीकरणा विरोधात हातात झेंडे घेऊन घोषणाबाजी करत मुख्य मार्गाने रेल्वेस्थानक परिसरात दाखल झाले.यावेळी शहर पोलिसांनी त्यांना तात्काळ ताब्यात घेऊन पो स्टे मध्ये आणले.
या आंदोलनात जितेंद्र चोपडे,वामनराव रायपुरे, विश्वरूप कवीश्वर,डॉ यशवंत वानखडे,शेख इक्रोमोद्दीन, महेश वाकदकर,दयाराम मुंडे, फकीरा वानखडे,शे. अकबर,शे. महेबूब,शे. हुसेन,ओम मुंडोळे, शे. जावेद,सुरेश गायकवाड,मनोहर साठे,जीवनगीर गोसावी,संतोष सोनोने,वसंता चोपडे,सुरेश कराळे आदि सहभागी होते.