शेगाव /बुलडाणा : मुंबईला कोविड हॉस्पिटलमध्ये काम करुन आपल्या गावी शेगावला आलेल्या एका ३० वर्षीय डॉक्टरला कोरोनाची लागण झाल्याचा प्रकार ८ जून रोजी उघडकीस आला. सदर डॉक्टर स्थानिक एसबीआय कॉलनी मधील मूळ रहिवाशी असून मुंबई येथून काही काही दिवसांपूर्वी ते शेगावला परतले आणि स्वतः स्थानिक हॉटेल एमटीडीसीमध्ये एका खोलीत सेल्फ क्वारंटाईन म्हणून राहत होते.शनिवारी त्यांना कोरोनाचे लक्षण आढळून आल्याने सईबाई मोटे रुग्णालयाने त्यांचे स्वॅब घेऊन तपासणीला पाठवले होते. सोमवार ८ जून रोजी त्यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.सदर पॉझिटिव्ह रुग्ण असलेल्या डॉक्टरला सध्या उपचारासाठी येथील सईबाई मोटे रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी यांनी दिली.रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आलेला एरिया सील करण्यात येत असून क्वारंटाईन झोन तयार केला जाणार असल्याची माहिती मिळाली आहे तर बुलडाण्यात मुंबईवरून परत आलेल्या त्या महिलेच्या संपर्कात येईल व अन्य संपर्कात आले रिपोर्ट आले असतानाच जो ड्रायव्हर त्यांना आणण्यासाठी गेला होता त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने बुलडाणा शहरात खळबळ उडाली आहे.
previous post