श्रींच्या दर्शना करीता येणाऱ्यां भाविकांना त्रास..
शेगाव: येथील नगरपालिकेच्या भोंगळ कारभारामुळे चक्क नगरपालिकेच्या समोरच घाण पाणी मंदिराकडे जाणार्या रस्त्यावर पसरल्यामुळे भाविक संतप्त झालेले दिसत होते. महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्र असलेल्या संत नगरी शेगाव शहरात श्री संत गजानन महाराजांच्या दर्शना निमित्त महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून दररोज शेकडो भाविक बाहेरगावी येथून येतात मोठ्या श्रद्धेने येत असलेल्या भाविकांना शेगाव नगरपालिकेच्या कार्यालयासमोरच गांधी चौकामध्ये मंदिराकडे जाणार्या रस्त्यावर वाहत असलेल्या घाणपाण्यातूनच येजा करावी लागत होती. त्यामुळे श्रींच्या मंदिरात दर्शनासाठी पायी जाणार्या भाविकांना रस्त्यावर पसरलेल्या व साचलेल्या घाणयुक्त पाण्यातूनच मंदिराकडे जावे लागत असल्याने भाविकांच्या धार्मिक असलेला धक्का पोहोचण्याची प्रतिक्रिया अनेक भाविकांनी बोलून दाखविली. शेगाव येथील गांधी चौक परिसरात नगरपालिकेचे कार्यालय असून नगरपालिका कार्यालयाच्या हाकेच्या अंतरावरच नालीमध्ये कचरा साचून नाली मधील घाण व दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर येऊ लागले व परिसरात सर्वत्र नालीचे घाण युक्त पाणी जमा झाल्याने या ठिकाणी तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते.नालीतील घाणयुक्त व दुर्गंधीयुक्त पाणी दुकानासमोरच नसल्यामुळे दुकानदार सुद्धा त्रस्त झालेले दिसत होते शेगाव नगरपालिकेत च्या प्रशासनाने या बाबीची दखल घेऊन त्वरित उपाययोजना करावी व भाविकांच्या धार्मिक श्रद्धेला धक्का पोहोचणार नाही याबाबत दक्ष असावे अशी मागणी भाविकांकडून करण्यात येत आहे