शेगांव : लॉकडाऊन मध्ये सोशल डिस्टंसिंग चे नियम काटेकोरपणे पाळणारी स्टेट बँक ऑफ इंडिया आता अनलॉक मध्ये मात्र कोरोनाच्या विळख्यात सापडताना दिसत आहे. शेगाव येथिल स्टेट बँक ऑफ इंडियाचे कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने व इतर कर्मचारी होम क्वारांटाईन करण्यात आल्याने शेगाव येथील भारतीय स्टेट बँक शाखा बंद करण्यात आली आहे तसा फलक बँके समोर लावण्यात आला असून यामुळे ग्राहकांची मोठी च अडचण झाली आहे, त्यानंतर बँकेमधील सर्व कर्मचाऱ्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. एकूण 34 कर्मचाऱ्यांचे स्वॅब हे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी 20 कर्मचारी यांचे रिपोर्ट आज सकाळी निगेटिव आले आहेत.पावसाळा सुरू असल्याने बियाण्यांच्या खरेदीसाठी पैसे काढणे व पीक कर्जासाठी ग्रामीण भागातील नागरिकांची या बँकेत मोठी रेलचेल असते यामुळे येथे संपर्कामुळे होणाऱ्या संसर्गाचा धोका अधिक आहे. या कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेल्या ची यादी ही लांबलचक असल्याची शक्यता नाकारता येत नाही.शेगाव शहरात लॉकडाऊन चे पालन नागरिकांकडून होत नसल्याने संसर्गाचा धोका वाढला आहे.अनेक ठिकाणी नागरिक मास्क न लावता फिरतांना दिसून येत आहे. काही ठिकाणी फळ विक्रेते ते भाजीपाला विक्रेते हे मास्क शिवाय फिरताना दिसून येत आहेत. तसेच शहरातील काही दुकानांमधे फिजिकल डिस्टनसिंग चे पालन न करता गर्दी करताना दिसत आहेत.या दुकानात होणारी गर्दी ही जास्त असल्याने यावर कडक कारवाई होणे गरजेचे झाले आहे.या कर्मचाऱ्यांच्या बँकेच्या माध्यमातून शेगाव शहर आणि तालुक्यातील अनेक नागरिकांचे सोबत प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे संपर्क आला असू शकतो त्यामुळे संपूर्ण बँकेत ही कंटेनमेंट म्हणून घोषित करण्यात आली आहे.बँक कधी सुरू होईल या बाबत फलक वर कोणतीही सूचना नाही त्यामुळे शेतकऱ्याचा जीव टांगणीला लागला आहे. बँक बंद राहणार असल्याने सामान्य नागरिक व शेतकऱ्याच्या अडचणी वाढणार आहे, मात्र यामुळे शेतकरी सामान्य माणसांचे हाल होणार आहेत हे नक्कीच… त्यामुळे लवकरच सरकारने यांची तात्पुरती दुसरी व्यवस्था करावी अशी मागणी शेतकरी व नागरिकांकडून होत आहे